18 January 2021

News Flash

Mi Days ! शाओमीच्या मोबाइल खरेदीवर 6,500 रुपयांपर्यंत सवलत

याशिवाय एक्स्चेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना 3,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते.

शाओमी कंपनीच्या स्मार्टफोनसाठी Amazon च्या संकेतस्थळावर Mi Days Sale सुरू झाला आहे. या सेलमध्ये शाओमीच्या स्मार्टफोन्सवर 6 हजार 500 रुपयांपर्यंत डिस्काउंटची ऑफर आहे.  याशिवाय एक्स्चेंज ऑफर अंतर्गत ग्राहकांना 3,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते. तसंच येस बँकेचं क्रेडिट अथवा डेबिट कार्ड असणाऱ्यांना 10 टक्के अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. आजपासून सुरू झालेला हा सेल 30 जूनपर्यंत सुरू असेल.

शाओमी एमआय ए2 या स्मार्टफोनवर  6,500 रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. या सेलमध्ये 10 हजार 999 रुपयांना हा फोन खरेदी करता येईल . तर यातील  6GB व्हेरिअंटवर 4 हजार 501 रुपयांची सवलत असून 15 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

शाओमी रेडमी वाय 2 या फोनवर 2 हजार 500 रुपयांची सूट असून  7,999 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करता येईल, तर  4GB रॅम आणि 64GB व्हेरिअंट 9,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.

शाओमी रेडमी 6 प्रो या फोनच्या बेसिक व्हेरिअंटवर देखील  2 हजार 500 रुपयांची सवलत आहे. हा फोन 8 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. तर याचं 4GB रॅम व्हेरिअंट 3 हजार 500 रुपयांच्या सवलतीसह 9 हजार 999 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

शाओमी एमआय स्पोर्ट्स ब्लूटूथ वायरलेस इअरफोन्स देखील या सेलमध्ये 1 हजार 499 रुपयांमध्ये खरेदी करता येतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2019 3:20 pm

Web Title: mi days on amazon get up to rs 6500 off on xiaomi sas 89
Next Stories
1 कधीपासून सुरू होणार Jawa ची डिलिव्हरी?
2 सॅमसंगचं ‘झकास’ स्मार्टवॉच, Galaxy Watch Active भारतात लाँच
3 Asus 6Z चा आज पहिला सेल, जाणून घ्या ऑफर्स
Just Now!
X