शाओमीने आपला Mi Note 10 Lite हा अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केलाय. हा फोन Mi Note 10 सीरिजमधला तिसरा फोन आहे. यापूर्वी कंपनीने Mi Note 10 आणि Mi Note 10 Pro हे दोन फोन आणले आहेत. Mi Note 10 Lite मध्ये 3डी कर्व्ह्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसरसह मागील बाजूला क्वॉड कॅमेरा अर्थात चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,260 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी आहे. हा फोन तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

फीचर्स :
Mi Note 10 Lite मध्ये एचडीआर 10 ला सपोर्ट करणारा 6.47 इंचाचा फुल-एचडी + कर्व्ह्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. अँड्रॉइड 10 वर आधारित हा फोन MIUI 11 वर कार्यरत असेल. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह, गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन आणि वॉटरड्रॉप नॉच यांसारखे फीचर्स आहेत. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730जी प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम असलेल्या या फोनच्या मागील बाजूला ड्युअल एलईडी फ्लॅशसह क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यातील 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. याशिवाय सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आलाय . कंपनीने या फोनमध्ये 128 जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोरेज मेमरी दिली आहे. मात्र, माइक्रोएसडी कार्ड सपोर्ट नाहीये. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 ए/बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, एनएफसी, आयआर ब्लास्टर आणि युएसबी टाइप-सी हे फीचर्स आहेत.

किंमत :
Mi Note 10 Lite ची किंमत 349 युरो म्हणजे जवळपास 29,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. तर, फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 399 युरो म्हणजे जवळपास 33,100 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनसाठी 8 जीबी रॅम व्हेरिअंटही असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, त्याच्या किंमतीबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लॅक, नेब्यूला पर्पल, ग्लेशियर व्हाइट अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. Mi Note 10 Lite भारतात कधीपर्यंत लॉन्च करणार याबाबत कंपनीने अद्याप काही माहिती दिलेली नाही. पण, देशातील लॉकडाउन उठल्यानंतर लगेच हा फोन भारतातही विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल अशी शक्यता आहे.