News Flash

Xiaomi चा बजेट स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, मिळेल 5000 mAh ची दमदार बॅटरी

16 फेब्रुवारीपर्यंत ऑफर

जर तुम्ही कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर शाओमीने तुमच्यासाठी काही चांगल्या ऑफर्स आणल्या आहेत. शाओमीच्या Mi Super Sale मध्ये कंपनीचे स्मार्टफोन आधीपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येतील. आठ फेब्रुवारीपासून या सेलची सुरूवात झाली असून 16 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरु असेल. या सेलमध्ये शाओमीच्या Redmi 8A या स्मार्टफोनवर शानदार ऑफर आहे.

पाहा फोटो – (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी)

दमदार 5000 mAh क्षमतेची बॅटरी असलेला हा फोन 7,999 रुपयांऐवजी केवळ 6,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय जर तुम्ही फोनच्या खरेदीसाठी ICICI क्रेडिट कार्डचा वापर केला तर 5% की इंस्टंट डिस्काउंट मिळेल. 25 सप्टेंबर 2019 रोजी हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. कमी किंमतीतला हा स्मार्टफोन म्हणजे Redmi 7A ची पुढील आवृत्ती आहे.

फीचर्स –
शाओमीच्या Redmi 8A स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाचा (15.8 सेंटीमीटर) डॉट नॉच डिस्प्ले आहे. ‘कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5’ चा सपोर्ट या फोनमध्ये असून Aura Wave ग्रिप डिझाइन आहे. AI फेस अनलॉक फीचर असलेल्या या स्मार्टफोनमध्ये वायरलेस FM रेडिओ देखील आहे. या स्मार्टफोनसाठी ‘स्मार्ट देश का दमदार स्मार्टफोन’ अशी टॅगलाइन कंपनीने वापरली आहे.

512GB पर्यंत वाढवता येणार स्टोरेज –
Redmi 8A मध्ये 18W फास्ट चार्जिंगसह 5,000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल सीम आणि डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्ड आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनची मेमरी 512GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

मागील बाजूला 12MP कॅमेरा –
या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे. फोनच्या पुढील बाजूला सेल्फीसाठी 8MP क्षमतेचा कॅमेरा आहे. तर, फोनच्या मागील बाजूला 12 मेगापिक्सल क्षमतेचा Sony IMX 363 सेंसर आहे. यामध्ये AI पोट्रेट मोड आणि Type-C USB आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये स्प्लॅश-प्रूफ P2i टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. हा फोन Midnight Black, Ocean Blue आणि Sunset Red अशा तीन रंगात उपलब्ध असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 8:39 am

Web Title: mi super sale budget smart phone redmi 8a discount offers sas 89
Next Stories
1 टाचदुखीने त्रास्त आहात ? ही काळजी घ्या म्हणजे मिळेल आराम
2 चॉकलेटचा इतिहास माहित आहे का?
3 Happy Chocolate Day: चॉकलेटसारख्या गोड BFFसाठी पत्र…
Just Now!
X