Mi Super Sale: जर तुम्ही नवीन Redmi स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे आज अखेरची संधी आहे. Xiaomi चे अधिकृत संकेतस्थळ Mi.com वर एमआय सुपर सेलचा आज अखेरचा दिवस आहे. 11 मार्चपासून हा सेल सुरू होता. या सेलमध्ये कंपनीकडून अनेक स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काउंट दिले जात आहे. जाणून घेऊया कोणत्या फोनवर किती रुपये डिस्काउंट आहे-

Redmi Note 8 Pro Price in India रेडमी नोट 8 प्रो (6 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज व्हेरिअंट) या सेलमध्ये 13 हजार 999 रुपयांमध्ये (एमआरपी 16,999 रुपये) उपलब्ध आहे. तर, 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 15,999 रुपये (एमआरपी 17,999 रुपये), 8 जीबी रॅम/128 जीबी व्हेरिअंट 17,999 रुपयांमध्ये (एमआरपी 19,999 रुपये) उपलब्ध आहे.

Redmi 8A Dual या स्मार्टफोनच्या 2 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची 6,499 रुपयांत (एमआरपी 7,499 रुपये) सेलमध्ये विक्री सुरू आहे. तर, 3 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 6,999 रुपयांमध्ये (एमआरपी 7,999 रुपये) खरेदी करता येईल.

Redmi K20 Pro या स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची 24,999 रुपयांत (एमआरपी 28,999 रुपये) सेलमध्ये विक्री सुरू आहे. तर, 8 जीबी रॅम/256 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 27,999 रुपयांमध्ये (एमआरपी 31,999 रुपये) उपलब्ध आहे.

रेडमी के20 (6 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज) हा स्मार्टफोन सेलमध्ये 19,999 रुपयांमध्ये (एमआरपी 22,999 रुपये) उपलब्ध आहे. तर, 6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज व्हेरिअंट 22,999 रुपयांमध्ये (एमआरपी 24,999 रुपये) खरेदी करता येईल.

रेडमी 8ए या स्मार्टफोनच्या 2 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज व्हेरि्अंटची 6,499 रुपये (एमआरपी 7,999 रुपये), तर 3 जीबी रॅम/32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची 6,999 रुपये (एमआरपी 8,999 रुपये) इतकी सेलमध्ये किंमत ठेवण्यात आली आहे.

याशिवाय, रेडमी गो या स्मार्टफोनच्या 1 जीबी रॅम/8 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची 4,299 रुपयांमध्ये (एमआरपी 5,999 रुपये) आणि 1 जीबी रॅम/16 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची 4,499 रुपयांमध्ये (एमआरपी 5,999 रुपये) विक्री सुरु आहे.