डॉ. शुभांगी महाजन

मायक्रोडमीब्रॅझन ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे. यामुळे त्वचेचा रंग आणि पोत अधिक तजेलदार उजळ, गुळगुळीत आणि चमकदार होण्यास मदत होते. वृद्धत्वाचे दृश्यमान परिणाम (उदा. सुरकुत्या) किंवा मुरुमांचे काळे डाग घालवण्यासाठीसुद्धा याचा वापर अनेक जण करतात.

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

मायक्रोडमीब्रॅझन म्हणजे काय?

मायक्रोडमीब्रॅझन ही एक सोपी आणि सुरक्षित कॉस्मेटिक प्रक्रिया आहे. यांत त्वचातज्ज्ञ मायक्रोडमीब्रॅझन यंत्राच्या तळीसारख्या तोंडातून त्वचेवर बारीक स्फटिक फवारतात किंवा चोळतात, ज्यामुळे त्वचेचा वरचा मृतथर निघून जाण्यास मदत होते आणि त्वचा अधिक टवटवीत आणि गुळगुळीत होते. मायक्रोडमीब्रॅझनचे दोन प्रकार आहेत –

१) क्रिस्टल मायक्रोडमीब्रॅझन

२) डायमंड मायक्रोडमीब्रॅझन

मायक्रोडमीब्रॅझन वेदनादायक आहे का?

नाही. यात वेदना होत नाहीत. फक्त प्रक्रियेदरम्यान त्वचेवर हलका दाब किंवा ताण जाणवतो. काहींना त्वचेवर मुंगी चालताना होणारी हालचाल किंवा मांजरीने गालावर जीभ फिरवल्यावर होणाऱ्या हालचालीसारखे वाटते.

मायक्रोडमीब्रॅझन कोणत्या कारणांसाठी उपयुक्त ठरते?

* टॅन झालेली त्वचा उजळ करण्यासाठी

* त्वचेचा रंग खुलवण्याकरिता

* त्वचेचा पोत सुधारण्यासाठी

*  वृद्धत्वाची दृश्यमान चिन्हे (उदा. सुरकुत्या; ढिलेपणा) कमी करण्यासाठी.

* मुरुमानंतर येणारे हलके काळे डाग घालवण्यासाठी

* वांगाचे डाग अस्पष्ट करण्यासाठी

मायक्रोडमीब्रॅझनचे फायदे –

* ही प्रक्रिया वेदनारहित किंवा कमी वेदनादायक आहे.

* सोपी आणि कमी वेळात होणारी प्रक्रिया आहे. (२० ते ४० मिनिटे)

* कोणत्याही रंगाची आणि त्वचेचा पोत असलेली व्यक्ती उपचारासाठी बाधा ठरत नाही.

* त्वचेच्या इतर प्रक्रियांपेक्षा कमी आक्रमक असल्यामुळे फारसे दुष्परिणाम दिसून येत नाहीत.

मायक्रोडमीब्रॅझनचे दुष्परिणाम –

*  ही एक सुरक्षित प्रक्रिया आहे.

* फारच थोडय़ा लोकांना इतके दुष्परिणाम जाणवू शकतात.

* उदा  – त्वचा लालसर होणे

* हलकी जळजळ होणे

* त्वचेवर हलकी सूज येणे

* मात्र हे परिणाम जास्तीत जास्त दोन-तीन दिवसांत निघून जातात.

किती सेशन्स लागतात?

वृद्धत्वाची दृश्यमान चिन्हे कमी करण्यासाठी किंवा मुरुमांचे काळे डाग घालवण्यासाठी अंदाजे पाच ते पंधराच्या दरम्यान उपचारांची आवश्यकता भासते. तुमच्या त्वचेचा प्रकार आणि उपचारांच्या कारणानुसार दर आठवडय़ाला, दर दोन आठवडय़ांनी किंवा मासिक उपचार होऊ शकतात. पंरतु, यामुळे दिसणारे परिणाम कायमस्वरूपी टिकवता येत नाहीत.

कोणती काळजी घ्यावी?

* मायक्रोडमीब्रॅझन  करताना फक्त त्वचारोगतज्ज्ञ किंवा अनुभवी आणि प्रशिक्षित सौंदर्यतज्ज्ञ यांच्याकडूनच करावी.

* उपचारांपूर्वी तुमच्या अपेक्षांबद्दल संबंधित तज्ज्ञांशी चर्चा करावी.

* उपचारानंतर कडक उन्हापासून त्वचेचे संरक्षण करावे.

* तज्ज्ञांनी दिलेले मॉश्चराइझर आणि सनस्क्रीन व्यवस्थित वापरावे.