मोबाईल कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये भारतीय आणि परदेशी कंपन्याही आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ग्राहकांना कमीत कमी किंमतीतील स्मार्टफोन देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित कऱण्याचा प्रयत्न मागच्या काही काळापासून या कंपन्या करत असल्याचे दिसते. हाच विचार करुन मायक्रोमॅक्सने नुकताच आपला एक स्मार्टफोन बाजारात दाखल केला असून त्याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. अवघ्या ४३९९ रुपयांत हा फोन खरेदी करता येणार असल्याचे कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे. भारत सीरिजचा भारत गो स्मार्टफोन लाँच केला आहे. मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला अँड्रॉईड गो बेस्ट स्मार्टफोन आहे.

मायक्रोमॅक्सने ‘मेरा पहिला स्मार्टफोन’ अशी या फोनची जाहिरात केली असून त्यावर कॅशबॅक देण्यासाठी एअरटेलसोबत डील केली आहे. एअरटेलची सर्व्हीस घेतल्यास या फोनवर २ हजार रुपयांची थेट सूट मिळणार असल्याने त्याची किंमत आणखी कमी म्हणजे २३९९ रुपये होणार आहे. अँड्रॉईड गो ही गुगलकडून तयार करुन घेण्यात आलेली खास ऑपरेटींग सिस्टीम असून डेटा वाचविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. जीमेल गो, मॅप्स गो, फाइल्स गो, क्रोम गो, यूट्यूब गो, असिस्टंट गो, प्ले स्टोअर आणि जीबोर्डसारख्या प्रीलोडेड अॅप्ससोबत येणार आहे.

या फोनमध्ये अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आली असून VoLTE सपोर्ट भारत गो अँड्रॉईड ओरियोवर चालतो. यामध्ये ४.५ इंचाचा TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनची रॅम १ जीबी असेल ८ जीबी इंटरनल मेमरी आणि ३२ जीबी एक्स्पांडेबल मेमरी देण्यात आली आहे. 1.1 GHz Media Tek MT6737 क्वॉडकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.