News Flash

“फिटनेस म्हणजे सिक्स पॅक, बायसेप्स नाही तर…”; मिलिंद सोमणने शेअर केला हटके फिटनेस फंडा

अभिनेता आणि सुपर माॅडेल मिलिंद सोमण नेहमीच त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून फिट राहण्याचा सल्ला देत असतो. असेच काही खास सल्ले त्याने आपल्या चाहत्यांना दिलेत

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद सोमण आज फिटनेस फ्रिक म्हणून ओळखला जातो. छायाचित्र सौजन्य : मिलिंद सोमण इंस्टाग्राम

करोनाकाळात स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवणे आवश्यक आहे. सोबतच रोग प्रतिकारशक्तीही वाढवणे गरजेचे असल्याने सध्या अनेक सेलिब्रिटी काही फिटनेस मंत्रा व डायट टिप्स सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना देताना दिसतात. यात अभिनेता  मिलिंद सोमण देखील मागे नसून दररोज तो व्हिडीओद्वारे वेगवेगळे व्यायाम प्रकारांसंदर्भात आपल्या चाहत्यांना माहिती देत असतो. वयाच्या ५५ व्या वर्षीही एखाद्या तरूणाला लाजवेल असा मिलिंदचा फिटनेस असल्याने त्याचा चाहता वर्ग ही खूप मोठा आहे.

त्याने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओसह त्याने व्यायाम प्रेमींना मनातल्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. “सध्या फिटनेसवर खूप चर्चा होत आहे. माझ्यासाठी फिटनेस म्हणजे सिक्स पॅक व बायसेप्स नसून, तंदुरुस्ती मनापासून सुरू होते आणि संपते,”असे मिलिंद म्हणाला.

पुढे त्याने निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त असे काही सल्ले आपल्या चाहत्यांना दिले. “प्रत्येक नात्यात सकारात्मकता निर्माण व्हावी म्हणून स्वतःला आणि इतर लोकांना चांगल्या प्रकारे समजून घ्या, स्वतःसाठी ठरविलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींना प्राधान्य द्या, बदलत्या परिस्थितीत मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जुळवून घ्या, स्वतःच्या अटींवर आयुष्य जगण्याची क्षमता निर्माण करा,” असं मिलिंदने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

देशातील पहिला पुरुष सुपर मॉडेल म्हणून अभिनेता मिलिंद सोमण ओळखला जातो. मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणारा मिलिंद आज अनेकांचा प्रेरणास्थान बनला आहे. मिलिंदची पत्नी अंकिता कोरवारही फिटनेसबाबत खूप आग्रही आहे. तसेच त्याच्या आईला देखील व्यायामाची फार आवड आहे. अनेकदा त्याची आई त्याच्यासोबत रनिंगसाठीही जाताना दिसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2021 4:29 pm

Web Title: milind soman parameters for fitness mrs 92
Next Stories
1 करोनातून बरं होण्यासाठी आयुर्वेद करु शकतं मदत; जाणून घ्या तीन टिप्स
2 तेच तेच काढे पिऊन कंटाळा आला असेल तर रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ही रेसिपी ट्राय करा
3 नियोजन आहाराचे : आहार गवंडीकाम करणाऱ्यांचा
Just Now!
X