26 September 2020

News Flash

दहावी पास असणाऱ्यांसाठी संरक्षण मंत्रालयामध्ये भरती

वयोमर्यादा १८ ते ३० वर्ष असून नोकरीचे ठिकाण मुंबई आणि पुणे आहे.

नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय विभागामध्ये विविध पदांची पदभरती जाहिरात प्रसिध्द झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

३१ डिसेंबर रोजी अर्ज प्रक्रियेला सुरूवात होत असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०२० पर्यंत आहे. या भरती प्रक्रियेसाठी कोणतेही आर्थिक शुल्क आकारले जाणार नाही. वयोमर्यादा १८ ते ३० वर्ष असून नोकरीचे ठिकाण मुंबई आणि पुणे आहे.

शैक्षणिक पात्रता :-
मजूर :- दहावी उत्तीर्ण
चौकीदार :- दहावी उत्तीर्ण
सिव्हिल मोटर ड्राइव्हर (CMD):- दहावी उत्तीर्ण व अवजड वाहने चालविण्याचा किमान तीन वर्षे अनुभव

अर्ज सादर करण्याचा पत्ता :–
ऑफिसर कमांडिंग, ७५२ ट्रान्स्पोर्ट कंपनी रॉस रोड, रेस कोर्स जवड, पुणे ४११००१

जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लीक करा –
अर्ज करण्यासाठी इथं क्लीक करा –

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2019 12:25 pm

Web Title: ministry of defence recruitment 2019 nck 90
Next Stories
1 रिलायन्स जिओ वापरताय? कंपनीनं ‘ही’ सेवा केली बंद
2 WhatsApp च्या या नव्या फिचरचा तुम्हाला होईल फायदा
3 सोन्याच्या मदतीने शोधता येणार पाण्यातील घातक बॅक्टेरिया
Just Now!
X