01 June 2020

News Flash

Truecaller देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर; सुरू केलं नवं फीचर

नव्या फीचरमध्ये युझर्सच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून Truecaller आपल्या अ‍ॅपमध्ये काही नवे फीचर्स जोडत आहे. आता ट्रूकॉलरनं आणखी एक नवं फीचर लाँच केलं आहे. कंपनीनं ‘Truecaller Group Chat’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये इन्वाईट, हिडन नंबर, चॅट आणि एसएमएस दरम्यान स्विचिंगसोबतच कॅटेगराईज्ड इनबॉक्ससारखे फीचर देण्यात आले आहे. १८ ऑक्टोबरपासून अँड्रॉईड आणि आयओएससाठी हे फीचर सुरू करण्यात आलं आहे. अ‍ॅप स्टोअर आणि गुगल प्लेमधून ट्रूकॉलरचं नवं व्हर्जन डाऊनलोड करता येऊ शकतं.

ट्रूकॉलरचं हे फीचर व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देऊ शकेल असं म्हटलं जात आहे. ग्रुप चॅट इन्वाईट फीचर हे युझर्सची प्रायव्हसी ध्यानात ठेवून तयार करण्यात आले आहेत. युझरच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांना ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपनंही नुकतंच हे फीचर लाँच केलं होतं.

दुसऱ्या फीचरबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये आता हिडन नंबर फीचर दिलं आहे. याद्वारे अनोळखी व्यक्तीला मोबाइल क्रमांक दिसणार नाही. ग्रुपमधील ज्या युझर्सचे मोबाइल क्रमांक सेव्ह असतील त्यांनाच त्या व्यक्तीचा क्रमांक दिसेल. जर एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक पहायचा असल्यास संबंधिताला समोरच्या व्यक्तीला आधी रिक्वेस्ट पाठववी लागणार आहे. ट्रूकॉलर ग्रुप चॅट युझर्स सहजरित्या चॅट आणि एसएमएसमध्ये स्विच करू शकतात. इंटरनेट कनेक्शन सुरू नसेल तरी त्या युझरला ब्ल्यू आणि ग्रीन सेंट बटन पाहता येमार आहे. याव्यतिरिक्त कॅटेगराइज्ड इनबॉक्स फीचरही देण्यात आला आहे. याद्वारे सेव्ह केलेले मोबाइल क्रमांक आणि सेव्ह न केलेले मोबाइल क्रमांक आणि स्पॅम मेसेजेस वेगवेगळे पाहता येऊ शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2019 1:53 pm

Web Title: mobile app truecaller launches new feature group chat competition for whatsapp trending news jud 87
Next Stories
1 आता येतोय Motorola चा फोल्डेबल फोन, 13 नोव्हेंबरला होणार लाँच
2 Sherco-TVS कडून ‘डकार रॅली’साठी टीमची घोषणा, भारताचा रायडर हरिथ नोहा करणार पदार्पण
3 Nokia चा नवा फीचर फोन : 27 तासांपर्यंत ऐकता येतील गाणी, किंमत 1,599 रुपये
Just Now!
X