मोबाईल हरवला तर त्याचा आयएमईआय (IMEI) क्रमांकावरून शोध घेतला जातो. पण अनेकदा बोगस आयएमईआय तयार केल्यानं त्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळं आता दूरसंचार विभागानं नवीन नियम तयार करण्याचा विचार सुरू केला आहे. आयएमईआय क्रमांकाशी छेडछाड केल्यास दंड आणि तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचा दूरसंचार विभागाचा विचार आहे.

याच आयएमईआय क्रमांकावरून मोबाईलचा शोध घेण्यास मदत होते. दूरसंचार विभागाकडून तयार करण्यात येणाऱ्या नवीन नियमांमुळे बोगस आयएमईआय क्रमांक रोखता येतील तसंच मोबाईल फोन ट्रॅकिंग करणेही आणखी सोपे होईल. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, बनावट आयएमईआय क्रमांकांमुळे मोबाईल ट्रॅकिंग करणं कठिण होत होतं. त्यामुळं ते रोखण्यासाठी दूरसंचार विभाग ठोस पावलं उचलणार आहे. या विशिष्ट क्रमांकाशी छेडछाड केल्यास तीन वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा केली जाऊ शकते. यासंबंधी नवीन नियम आणण्याचा दूरसंचार विभागाचा विचार सुरू आहे.

number of Pune residents spending lakhs of rupees to get attractive number for vehicle has increased
आकर्षक क्रमांकासाठी पुणेकरांचा होऊ दे लाखोंचा खर्च! जाणून घ्या सर्वांत महागडे क्रमांक…
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
Stock market indices Sensex and Nifty registered gains
अर्थवर्षाची निर्देशांक तेजीनेच सांगता; वर्षभरात सेन्सेक्सची २४.८५ टक्के, तर निफ्टीची २८.६१ टक्के झेप
IPL 2024 : सर्वांच्या सहमतीनेच निर्णय! सातव्या क्रमांकावर खेळण्यावरून हार्दिकची पोलार्डकडून पाठराखण

दरम्यान, अशाच एका प्रकरणात काही दिवसांपूर्वी दिल्लीतील संगम विहार पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली होती. त्या तरुणांनी काही डिव्हाईसच्या मदतीने चोरीच्या स्मार्टफोनचे आयएमईआय क्रमांक बदलले होते. पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले असले तरी बदललेल्या या विशेष क्रमांकामुळे चोरीचे फोन मूळ मालकांपर्यंत पोहोचवणे पोलिसांसाठी जिकिरीचे झाले होते. त्यामुळेच मोबाईलचे बोगस आयएमईआय क्रमांक तयार करण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मोबाईल फोन ट्रॅकिंग करणे सोपे व्हावे यासाठी दूरसंचार विभाग नवीन नियम तयार करत आहे. दूरसंचार विभागाने उचललेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात मोबाईल बाजार वेगाने विकसित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोबाईलच्या सुरक्षेसंबंधी कठोर नियम तयार करणे खूपच गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.