मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी सेवा 4 ते 10 नोव्हेंबरदरम्यान बंद असेल अशी माहिती भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (ट्राय) देण्यात आली आहे. सेवेत सुधारणा करण्यासाठी 4 ते 10 नोव्हेंबरदरम्यान ही सुविधा बंद राहणार आहे. त्यानंतर ही सुविधा अधिक सोयीस्कररित्या 11 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

11 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सुधारित योजनेत समान सेवाक्षेत्रात नंबर न बदलता कंपनी बदलायची असेल तर, केवळ 2 दिवस लागतील. याशिवाय एका सर्कलमधून दुसऱ्या सर्कलमध्ये सेवा बदलून नंबर कायम ठेवायचा असेल तर 5 दिवसांचा अवधी लागेल. आधीपेक्षा अधिक जलदगतीने आणि कार्यक्षमरित्या ही प्रक्रिया पार पडेल.

आणखी वाचा- ‘जिओ’चे चार All IN ONE प्लॅन लाँच ; दररोज 2GB डेटा आणि कॉलिंग

सेवेत सुधारणा करण्याची तांत्रिक कामं पूर्ण करण्यासाठी ही सेवा 4 ते 10 नोव्हेंबरदरम्यान बंद ठेवली जाईल. या दरम्यान ग्राहकांनी नंबर पोर्टेबिलिटीसाठी विनंती केली तरीही प्रतिसाद मिळणार नाही, असे ट्रायने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.