जगप्रसिद्ध मॉडेल मारा मार्टिनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. स्पोर्ट्स इलेस्ट्रेटेड स्विमसूट फॅशन शो दरम्यान मारा मार्टिनने आपल्या ५ महिन्यांच्या मुलीला स्तनपान करत रॅम्पवॉक केला. हे दृश्य पाहून उपस्थित अचंबित झाले. या फॅशन शोच्या दरम्यान सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या मारा मार्टिनवरच. मारा मार्टिन स्विम सूट घालून आणि बाळाला स्तनपान करत रॅम्पवर आली. तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. सगळेजण एकमेकांकडे पाहू लागले आणि सगळ्यांनीच मारा मार्टिनच्या धाडसाचे कौतुक केले. त्यानंतर तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारा मार्टिनचे तिच्या रॅम्पवॉकबाबत सगळ्यांनीच कौतुक केले. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत माराने तिच्या पाच महिन्यांच्या मुलीला स्तनपान करताना रॅम्प वॉक करताना दिसते आहे. अरिया असे या मुलीचे नाव आहे. स्विम सूट फॅशन शो मध्ये मारा मार्टिन अशा प्रकारे मुलीला घेऊन आली याची चर्चा रंगली होती. या बिकीनी फॅशन शोमध्ये अनेक मॉडेल्सने सहभाग घेतला होता. मात्र सर्वात जास्त चर्चा झाली ती मारा मार्टिनने केलेल्या रॅम्प वॉकची. स्विम सूट घालून माराने आपल्या मुलीला स्तनपान केले आणि ती रॅम्पवरून चालली. हा व्हिडिओ इंटरनेटवर सध्या धुमाकूळ घालतो आहे. मारा जेव्हा रँम्पवर दाखल झाली तेव्हापासून ती जाईपर्यंत टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता.

मारा मार्टिन ही मिशीगनची राहणारी आहे. तसेच ती त्या १६ फायनलिस्टपैकी एक आहे ज्यांची निवड स्विम वीकसाठी स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड मॅगझिनद्वारे झाली आहे. या फॅशन शोमध्ये सहभाग घेण्यापूर्वी मारा मार्टिनने आपल्या मुलीसोबतचा एका फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला होता.

पाहा व्हिडिओ

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Model mara martin breastfed her baby while on the catwalk
First published on: 17-07-2018 at 20:02 IST