जिल्हा – रायगड

जायचं कसं ? – पुण्याहून ताम्हिणी घाट उतरल्यावर विळे गाव आहे. इथून निजामपूरला जाताना वाटेतील शिरवली फाट्यावरून कुर्डूगड पायथ्याला असलेल्या उंबर्डी गावात जाण्याचा मार्ग आहे.

coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
Makeup tips for people with oily skin during summer
Summer Makeup Tips: उन्हाळ्यात मेकअप कसा करावा? असा करा स्वेट प्रूफ मेकअप
grape summer cooler juice recipe
Summer drink : उन्हाळ्यात थंडावा देईल ‘हे’ हिरवेगार सरबत! ‘या’ फळाचा करा वापर

जेवणाची सोय – गडावर जाताना जेवण सोबत घेऊन जावे.

पाण्याची सोय – गडावर पाणी उपलब्ध आहे.

उंबर्डी गावातून समोरच विश्रामगडाचा सुळकेवजा किल्ला दिसतो. उंबर्डी गावात एक भग्न हेमाडपंथी शिवमंदिर आतिशय लक्षवेधी आहे. उंबर्डीतून निघाल्यापासून आपण तासाभरात विश्रामगडाच्या अर्ध्यावर वसलेल्या कुर्डूपेठ या गावी पोचतो. गावात कुर्डाई देवीचे मंदिर असून ह्याच देवीच्या नावावरून गडाला कुर्डूगड हे नाव मिळाले आहे. मंदिराच्या बाहेरील गजांतलक्ष्मी शिल्पसुद्धा पाहण्यासारखे आहे. मंदिरापासून विसेक मिनिटांमध्ये पाय-या चढून आपण गडाच्या भग्न दरवाजात पोहोचतो. जवळच पाण्याची टाकी खोदलेली आहेत. पुढे गेल्यावर गडाच्या सुळक्याला प्रदक्षिणा मारण्याच्या वळणावर मिशा असलेल्या हनुमानाची मूर्ती उघड्यावर आहे.

गडाच्या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून समोर पाण्याचे टाके आहे. पश्चिमेकडे गडाचा हनुमान बुरुज नावाचा बुरुज असून समोरच विश्रामगडाच्या सुळक्याला चिकटलेला एक प्रस्तर आपल्याला दिसतो. ह्या दोन्हीच्या मध्ये नैसर्गिकरीत्या खिडकी तयार झालेली असून स्थानिक भाषेत त्याला कोकण खिडकी हे नाव आहे. विश्रामगड हा पावसाळ्यात व सप्टेंबर – ऑक्टोबरच्या कालावधीत स्वर्गीय अनुभूती देणारा आहे. हिरवागार असलेला किल्ल्याचा सुळका व आजूबाजूचा कोकणातील पावसाने बहरलेला प्रदेश हे पाहणं हीच विश्रामगडाच्या ट्रेकमधील पर्वणी ठरते.

ओंकार ओक