News Flash

प्री-बूकिंगआधीच Reliance Jio GigaFiber च्या किंमती झाल्या लिक, जाणून घ्या डिटेल्स

बहुप्रतिक्षित Reliance Jio GigaFiber च्या किंमती बूकिंग सुरू होण्याआधीच लिक झाल्या आहेत

मुकेश अंबानी (संग्रहित छायाचित्र)

बहुप्रतिक्षित Reliance Jio GigaFiber च्या किंमती बूकिंग सुरू होण्याआधीच लिक झाल्या आहेत. 15 ऑगस्टपासून जिओगिगाफायबर सेवेसाठी नोंदणी सुरू होत आहे. गेल्या महिन्यात 5 जुलै रोजी रिलायन्सच्या 41 व्या सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी जिओगिगाफायबर ही ब्रॉडबँड सेवा घराघरात देण्याची घोषणा केली होती. पण नोंदणी सुरू होण्याआधीच trak.in या संकेतस्थळावर याच्या प्लॅन्स आणि किंमती लिक झाल्या आहेत.

trak.in ने जाहीर केल्यानुसार, जिओगिगाफायबरच्या प्लॅनची सुरूवात 500 रुपयांपासून होईल. ग्राहकांसाठी जिओकडून 500, 750, 999, 1,299 आणि 1,500 रुपयांचे प्लॅन्स उपलब्ध असतील.

जाणून घेऊया डिटेल्स –

 • 500 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 एमबीपीएस स्पीडसह 300 जीबी डेटा मिळेल. 30 दिवस या प्लॅनची व्हॅलिडीटी असेल.
 • 750 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50 एमबीपीएस स्पीडसह 450 जीबी डेटा मिळेल. 30 दिवस या प्लॅनची व्हॅलिडीटी असेल.
 • तर, 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 600 जीबी डेटा मिळेल, याचा स्पीड 100 एमबीपीएस असेल. या प्लॅनचीही व्हॅलिडीटी 30 दिवसांसाठी असेल.
 • 1,299 रुपयांच्या प्लॅनमध्ये 750 जीबी डेटा मिळेल, याचा स्पीड 100 एमबीपीएस असेल. या प्लॅनचीही व्हॅलिडीटी 30 दिवसांसाठी असेल.
 • इंटरनेटचा जास्त वापर करणाऱ्यांसाठी कंपनीकडून 1,500 रुपयांचा प्लॅन लॉन्च करणार आहे. या प्लॅनमध्ये 150 एमबीपीएस स्पीडसह तब्बल 1000 जीबी डेटा मिळेल. 30 दिवसांसाठी या प्लॅनची व्हॅलिडीटी असेल.
 • विशेष म्हणजे सर्व प्लॅन्समध्ये डेटा मर्यादा संपल्यानंतरही (FUP ) कमी स्पीडसह इंटरनेटचा वापर करता येईल.
 • अन्य डिटेल्स –
 •  ही सेवा रिलायन्स जिओ टप्प्याटप्प्याने सुरू करु शकतं. पहिल्या टप्प्यात म्हणजे नोव्हेंबरमध्ये देशाच्या 15 ते 20 मोठ्या शहरांमध्ये या सेवेची सुरूवात होईल.
 •  रिलायन्स जिओच्या सीमकार्डप्रमाणेच सुरूवातीचे 3 ते 6 महिने ग्राहकांना जिओ गीगा फायबरची सेवा मोफत पुरवली जाऊ शकते अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 •  टेलिकॉम सेक्टरमधील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या सेवेची सुरूवात मागणीनुसार केली जाईल. सर्वाधिक नोंदणी ज्या शहरांमध्ये होईल त्याच शहरांमध्ये ही सेवा सर्वप्रथम सुरू केली जाईल.
 • सद्यस्थितीत एअरटेल कंपनी अनेक शहरांमध्ये ब्रॉडबॅंड सेवा पुरवत आहे. बंगळुरूमध्ये राहणाऱ्यांसाठी एअरटेलचा 799 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 40mbps च्या स्पीडसह एक महिन्यासाठी 50 GB डेटा मिळतो. तर दिल्लीमध्ये 499 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 8mbps चा स्पीड आणि 100gb डेटा दिला जातो.
 • बाजारातील सुत्रांनुसार, या सेवेद्वारे एअरटेलला कडवी टक्कर देण्याचा रिलायन्सचा प्रयत्न असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 1:44 pm

Web Title: monthly plans of reliance jio gigafiber leak before pre bookings start
Next Stories
1 या व्हायरल फोटोंचं सत्य वाचून तुम्ही व्हाल अवाक् !
2 शब्द पाळला! ‘शूज डॉक्टर’साठी आनंद महिंद्रांनी दिली अनोखी भेट
3 इम्रान खान पाकिस्तानमधला केजरीवालांचा अवतार!
Just Now!
X