News Flash

…म्हणून मूगडाळ भजी अधिक आरोग्यदायी; जाणून घ्या रेसिपी आणि फायदे

यंदाच्या पावसाळ्यात मूगडाळ भजी नक्की करा ट्राय

डॉ. सारिका सातव

साहित्य

* मूगदाळ- २ वाटी

*  चिरलेली कोथिंबीर- पाव वाटी

*  हिंग- १ चिमूट

*  मिरे, धने- प्रत्येकी एक छोटा चमचा

*  आले- अर्धा इंच ल्ल  हिरवी मिरची- १ ते २

*  मीठ आवश्यकतेनुसार ल्ल तेल

कृती

*  मूगदाळ रात्री भिजत घालावी.

*  भिजलेली मूगडाळ पाणी निथळून मिरची, आले, हिंग टाकून वाटून घ्यावी.

*  घट्टसर मिश्रण तयार करून चवीनुसार मीठ टाकावे.

*  मिरे, धने जाडसर वाटून त्यात मिसळावे.

* कोथिंबीर मिसळून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे.

* तेल तापवून या मिश्रणापासून भजी तयार कराव्यात.

* कोथिंबीर चटणी/ चिंचेच्या चटणीबरोबर गरम गरम खाण्यास द्याव्यात.

वैशिष्टये आणि फायदे

* चवीस उत्तम. पचनाच्या तक्रारी येत नाहीत.

* डब्याला नेण्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम

* विविध भाज्या टाकल्या तर अधिक रूचकर बनतो.

* कॅल्शिअम, आयर्न, तंतुमय पदार्थ, कबरेदके आणि प्रथिने यातून मिळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 12:20 pm

Web Title: moong dal bhaji is healthy food here is the recipe in marathi scsg 91
Next Stories
1 शाओमीच्या पाच कॅमेऱ्यांच्या बजेट फोनचा ‘फ्लॅशसेल’, जाणून घ्या बेस्ट ऑफर्स
2 चेक शर्ट विकत घेताना ‘या’ टिप्स लक्षात ठेवाच
3 Realme च्या लेटेस्ट X3 सीरिजचा भारतातील पहिला ‘सेल’, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Just Now!
X