08 July 2020

News Flash

ग्रामीण भागातील मुलांना औषधोपचारांतून विषबाधेचा अधिक धोका

ग्रामीण भागातील मुलांना औषधोपचांरातून होणाऱ्या विषबाधेबाबत अधिक सखोल संशोधन करण्याची गरज आहे.

| January 4, 2016 01:50 am

भौगोलिकदृष्टय़ा कुठल्या भागात अशी परिस्थिती आहे

आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पाच वर्षांवरील मुलांना औषधोपचारांतून विषबाधेचा धोका अधिक असल्याचा इशारा एका अभ्यासातून देण्यात आला आहे.
यासाठी ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात असलेली बेरोजगारी, उच्च शिक्षणाचा अभाव आणि कमी घरगुती उत्पन्न ही कारणे असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
भौगोलिकदृष्टय़ा कुठल्या भागात अशी परिस्थिती आहे हे समजू शकल्यास त्यात हस्तक्षेप करून अशा मुलांना मदत करणे शक्य होईल, असे पिट्सबर्ग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे साहाय्यक प्राध्यापक अँथनी फॅबियो यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील डॉक्टरांनी मुलांमधील अस्पष्ट आजाराबाबत अधिक सखोल अभ्यास केल्यास त्यांना योग्य ते उपचार करणे शक्य आहे, असेही फॅबियो म्हणाले. संशोधकांनी २६ हजार ६८५ केंद्रांमध्ये २००६ ते २०१० या कालावधीत पाच वर्षांखालील मुलांचा अभ्यास केला. या मुलांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञांचे सल्ले घेण्यात आले. तसेच, या मुलांना अत्यावश्यक सुविधा देऊन पाहणी करण्यात आली. संशोधकांनी पूर्व आणि मध्य पेनास्लाव्हिया भागांतील दुर्गम भागातील औषधोपचारांमुळे विषबाधा झालेल्या लहान मुलांचा शोध घेतला. त्यामुळे या भागातील लोक पिट्सबर्ग विषबाधा केंद्रात मदतीसाठी संपर्क साधतात. या भागातील लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणात बेरोजगारी असली तरी स्थानिक औषधोपचारांमुळे होणाऱ्या विषबाधेमुळे ते पिट्सबर्ग केंद्रात उपचारांसाठी धाव घेतात.
ग्रामीण भागातील मुलांना औषधोपचांरातून होणाऱ्या विषबाधेबाबत अधिक सखोल संशोधन करण्याची गरज आहे. यासाठी अशा भागातील लोकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. स्थानिक भागातील डॉक्टरांनी आजाराबाबत योग्य ते परीक्षण करून औषधोपचार करण्याची गरज आहे.
– अँथनी फॅबियो, साहाय्यक प्राध्यापक, पिट्सबर्ग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2016 1:50 am

Web Title: more risk in medicine treatment for rural areas children
Next Stories
1 कर्करुग्ण मुलांसाठी खास पाककृतींचे पुस्तक
2 शुद्ध पाण्यातही जिवाणूंचे अस्तित्व
3 स्वाइन फ्लू जनजागृतीसाठी केंद्र सज्ज
Just Now!
X