दोन दिवसांपूर्वी अ‍ॅमेझॉनच्या ‘प्राईम डे’ सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. या सेलचा सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसह प्राईम मेंबर्सनं सर्वाधिक फायदा मिळाल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार या दोन दिवसांच्या कालावधीत ४ हजारांपेक्षा अधिक विक्रेत्यांनी १० लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या वस्तूंची विक्री केली. याव्यतिरिक्त २०९ व्यापारी या ४८ तासांमध्ये कोट्यधीश झाले असल्याचंही कंपनीकडून सांगण्यात आलं. एसएमबी विक्रेते, नवे प्राईम मेंबर्स आणि प्राईम सेवेचा लाभ घेणाऱ्यांसाठी हा लाभदायक कालावधी ठरल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे.

एसएमबी भागीदारीसोबत ५ हजार ९०० पेक्षा अधिक पिनकोडवरील ९१ हजार पेक्षा अधिक एसएमबी, कामगार, विणकर आणि महिला उद्योजकांनी प्राईम डे २०२० मध्ये भाग घेतला. यापैकी ६२ हजार विक्रेते हे मेट्रो शहरांव्यतिरिक्त म्हणजेच टियर २ आणि टियर ३ शहरांमधील होते असंही कंपनीनं सांगितलं.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ३१ हजार एसएमबी विक्रेत्यांनी आतापर्यंतही सर्वाधिक विक्री केली. तर विणकर आणि अन्य कामगारांनही आपल्या दैनंदिन विक्रीपेक्षा तब्बल ६.७ टक्के अधिक विक्री केली. तर सहेली या कार्यक्रमांतर्गत असलेल्या महिना उद्योजकांनी २.६ टक्के अधिक विक्री केली. १०० पेक्षा अधिक शहरांमधील स्थानिक दुकानदारांनी प्राईम डे वर पहिल्यांदा आपल्या वस्तूंच्या विक्रीची सुरूवात केली. त्यांची सरासरी विक्रीदेखील दुप्पट होती, असं कंपनीकडून सांगण्यात आलं. प्राईम डे दरम्यान देशातील ९७ टक्क्यांपेक्षा अधिक पिन कोड युझर्सनं निरनिराश्या वस्तूंची खरेदी केली असून गेल्या प्राईम डे च्या तुलनेत यावेळी दुप्पट ग्राहकांनी साईन अप केल्याचंही अ‍ॅमेझॉननं सांगितलं.