News Flash

सकाळचा नाश्ता कसा आसावा? त्याचे हे आहेत फायदे

मनःस्थितीत, आत्मविश्वासात आणि चैतन्यात वाढ होते. 

– डॉ. शरद कासार्ले 

ग्रॅनोला हे रोल्ड ओट्स, दाणे, ड्राय फ्रूट्स, बिया, मसाले, नट बटर आणि साखर वा मधासारखे स्वीटनर यांचे एक भाजलेले मिश्रण आहे. प्रथिने, फायबर आणि सूक्ष्म पोषक घटक यांनी हे खाद्य समृद्ध आहे. लोह, मॅग्नेशियम, जस्त, तांबे, सेलेनियम, जीवनसत्वे बी व इ अशा सूक्ष्म पोषक घटकांचा पुरवठा हे खाद्य करते. बदाम, अक्रोड व काजू हे ड्राय फ्रूट्स, तसेच हेम्प, तीळ व भोपळा यांच्या बिया असे उच्च प्रथिने आणि फायबर असलेले घटक ग्रॅनोलामध्ये असल्याने, त्यातून संपूर्ण पोषण होते. ‘ग्रॅनोला’मध्ये प्रथिनांचे प्रमाण उच्च असल्याने त्याचा ‘घ्रेलिन’ व ‘जीएलपी-1’ यांसारख्या महत्त्वाच्या ‘हार्मोन्स’वर चांगला परिणाम होतो. म्हणूनच मंचिंग ग्रॅनोला हा एक उत्तम स्वरुपाचा, आरोग्यदायी असा खाद्यपदार्थ बनतो. मेंदूतील न्यूरॉन्स आणि निरोगी न्यूरोट्रांसमिशन सक्रिय होण्यास याने मदत होते आणि आपल्या मनःस्थितीत, आत्मविश्वासात आणि चैतन्यात वाढ होते.

‘ग्रॅनोला’चे आरोग्यदायी फायदे :  रक्तदाबात सुधारणा :ग्रॅनोला हा एक साधा नाश्ता आहे. उच्च रक्तदाब कमी करण्यास तो मदत करू शकतो. संशोधनात असे दिसून येते की ग्रॅनोला आहारात समाविष्ट केल्यावर त्यातील ओट्स आणि फ्लेक्सबिया यांसारख्या उच्च फायबर घटकांनी रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

‘कोलेस्टेरॉल’च्या पातळीत घट :‘ग्रॅनोला’मध्ये विद्रव्य फायबर असते. ते रक्तवाहिन्यांत फिरणारे, हृदयाच्या आरोग्यास हानिकारक असे कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते. ओट्स हा बीटा ग्लूकनचा चांगला स्रोत आहे. त्यातील फायबर एकूण व एलडीएल (वाईट स्वरुपाच्या) ‘कोलेस्टेरॉल’ची पातळी कमी करते. हे ‘एलडीएल कोलेस्टेरॉल’ हृदयरोगासाठी कारणीभूत ठरत असते.

रक्तातील साखरेच्या प्रमाणात घट :ग्रॅनोला मॅंगनीज या खनिजाने समृद्ध आहे. ते शरीरात रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यास मदत करते. संपूर्ण धान्य, ड्राय फ्रूट्स, दाणे आणि बिया यांच्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी आणि नियंत्रित होते. विशेषत: लठ्ठ किंवा मधुमेह होऊ शकणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा होऊ शकतो.

 आतड्याच्या आरोग्यात सुधारणा :‘ग्रॅनोला’मध्ये पचनशक्ती वाढवणारे आणि पोट निरोगी ठेवणारे घटक आहेत. रिफाईन्ड पदार्थांमधील तृणधान्यांच्या तुलनेत, ग्रॅनोलामधील फायबर हे आतड्याचा दाह कमी करण्यास मदत करतात. या फायबरमुळे आतड्यातील आरोग्यदायी जीवाणूंची पातळी वाढते.

 मेंदूच्या आरोग्यात सुधारणा आणि आकलनात्मक क्रियाकलापात वाढ  :शरीराच्या इतर भागांबरोबरच मेंदूमध्ये स्वच्छ रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढविण्यात ग्रॅनोला मदत करते. मेंदूला वेगवान आणि प्रभावीपणे कार्य करण्यास त्याने सहाय्य होते. ते आतडे आणि मेंदू यांच्यात समन्वय राखते. स्वस्थ आतड्यामुळे मेंदुच्या आरोग्याला उत्तेजन मिळते. अशक्तपणापासून बचाव करण्यास मदत :शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. अशक्तपणाचा सामना करण्यासाठी आणि तो प्रथमतः टाळण्यासाठी लोहासारख्या खनिज पदार्थांच्या समावेश ग्रॅनोलामध्ये करण्यात आला आहे.

 अँटीऑक्सिडंट घटकांचा पुरवठा :नारळ, सब्जाचे बी आणि ब्राझील नटसारखे पदार्थ हे ‘अँटिऑक्सिडंट’चे चांगले स्रोत आहेत. ग्रॅनोलामध्ये त्यांचा समावेश झाल्याने त्यातील ‘अँटीऑक्सिडेंट’ची पातळी वाढते. या घटकांमुळे गॅलिक अॅसिड, क्वेरेसेटिन, सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई यांचा पुरवठा होतो आणि शरीरातील दह कमी होतो.

ग्रॅनोला आणि दैनंदिन आहारामध्ये समाविष्ट करण्याजोगे काही आरोग्यदायी घटक :

सबजाचे बी हे रक्तातील ‘अल्फा लिपॉइक आम्ल’ (एएलए) वाढविण्यास मदत करते. ‘एएलए’ हे एक महत्त्वपूर्ण ‘ओमेगा-3 फॅटी अॅसिड’ आहे. त्याच्यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.

तीळ या बिया ‘लिग्नान्स’चा एक चांगला स्त्रोत आहेत. त्यामुळे ‘इस्ट्रोजेन’ या लैंगिक संप्रेरकाची स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासदेखील तीळ मदत करते

भोपळ्याच्या बिया या ‘मोनो अनसॅच्युरेटेड’ आणि ‘ओमेगा-6 फॅट’ यांचा चांगला स्रोत असतात. हृदयाचे आरोग्य सुधारण्यास व मूत्रमार्गाच्या विकारांची लक्षणे बरी करण्यास त्या मदत करतात.

सूर्यफुलाच्या बियांमध्येदेखील ‘मोनो अनसॅच्युरेटेड’ आणि ‘ओमेगा-6’ हे दोन्ही प्रकारचे फॅट मोठ्या प्रमाणात असतात. जळजळ आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास त्या मदत करतात.

अक्रोड हे प्रतिकारशक्ती, प्रजनन प्रणाली, मेंदू आणि हृदय यांच्या संरक्षणाची भिंत म्हणून कार्य करते. अक्रोड केवळ प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करत नाही, तर स्तनांच्या कर्करोगाची शक्यतादेखील कमी करते. अक्रोडमध्ये ‘अमिनो अॅसिड एल-आर्जिनिन’ असते. ते हृदयरोग असलेल्यांना लाभदायक असते. अक्रोड शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यातही मदत करते, तसेच वजन कमी करण्यास, मेंदूचे आरोग्य राखण्यास आणि टाइप 2 मधुमेह नियंत्रित ठेवण्यास सहाय्य करते. ग्रॅनोला हा न्याहारीसाठी आणि दोन जेवणांच्या मधल्या वेळेच्या खाण्यासाठी आरोग्यदायी असा सर्वात चांगला पर्याय आहे. हे एक सर्वांगीण उत्कृष्ट अन्न आहे. निरोगी घटकांचा समावेश असलेले ग्रॅनोला विविध स्वादांमध्ये उपलब्ध आहे. उपचारक्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या घटकांनी ग्रॅनोला हा नाश्त्याचा खास पदार्थ आहे.

(लेखक मंचिलिशिअस ग्रॅनोला येथे फूड सायंटिस्ट व टेक्नॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2020 2:49 pm

Web Title: morning breakfast benifits nck 90
Next Stories
1 VIDEO: मुलांचा स्क्रीनटाइम काळजीचा विषय
2 या घरगुती उपायाचा वापर करुन अशी घ्या कोरड्या केसांची काळजी
3 Airtel Independence Day Offer : फ्री मिळेल तब्बल 1000 जीबी अतिरिक्त डेटा, जाणून घ्या डिटेल्स
Just Now!
X