28 September 2020

News Flash

…म्हणून सकाळी चालणे आरोग्यासाठी उपयुक्त

शरीरावरील अनावश्यक वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही सकाळच्या चालण्याचा फायदा होतो.

प्रातिनिधिक छायाचित्र

व्यायाम हा आरोग्यासाठी अतिशय गरजेचा असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. मग यातही जिमला जाणे किंवा इतर काही करण्यापेक्षा चालणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय गरजेचे असते. यातही सकाळी उठल्याउठल्या चालायचा व्यायाम केल्यास त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. सकाळची फ्रेश हवा उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त ठरतेच पण वजन कमी करण्यासाठीही सकाळी चालण्याचा चांगलाच फायदा होतो. सकाळी चालण्याने तुमची प्रतिकारशक्तीही सुधारण्यासही मदत होते. शरीरावरील अनावश्यक वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही सकाळच्या चालण्याचा फायदा होतो. पाहूयात सकाळी चालण्याचे असेच काही फायदे…

१. कॅलरीज जाळण्यासाठी उपयुक्त – सकाळी चालण्याने तुमच्या हृदयाची क्रिया सुधारते. हृदयाचे ठोके वाढण्याने तुमच्या कॅलरीज जळण्यासही मदत होते. त्यामुळे नकळतच तुमचे वजन कमी होते, म्हणून उत्तम आरोग्यासाठी रोज सकाळी चालायची सवय ठेवा.

२. चरबी जळण्यासाठी चालण्याने फायदा – सकाळी वेगाने चालल्यास तुमचा अॅरोबिक व्यायाम होतो. त्यामुळे तुमच्या शरीरावरील ३५ टक्के चरबी जळण्यास मदत होते. वेगाने एखादी गोष्ट केल्यास तुमच्या कॅलरीज आणि चरबी जळण्यास मदत होते. ही गोष्ट नियमाने केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

३. चयापचय क्रिया सुधारते – सकाळी चालण्याने तुमची चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे दिवसभर तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे चांगल्यारितीने पचन होते. चालण्यामुळे शरीरातील सर्व क्रियांना वेग मिळतो आणि पचनशक्तीला त्याचा चांगला फायदा होतो.

४. स्नायूंची ताकद वाढण्यास मदत – चालण्यामुळे शरीराला ताण पडतो आणि काही प्रमाणात चरबी कमी होते. त्यामुळे नकळतच स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते. तब्येत चांगली ठेवायची असेल तर चरबीपेक्षा स्नायूंमध्ये ताकद असणे गरजेचे असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 7:28 pm

Web Title: morning walk is good for health know benefits of it
Next Stories
1 जिओ गिगाफायबरला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनची आकर्षक ऑफर दाखल
2 दारुमुळे दरवर्षी अडीच लाखाहून अधिक भारतीयांचा मृत्यू
3 फेरवापराची स्पर्शभिंगे धोकादायक
Just Now!
X