OnePlus कंपनीच्या स्मार्टफोनची मागच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. OnePlus 6 हा कंपनीचा बहुप्रतिक्षित फोन येत्या १७ मे लोजी लाँच होणार असल्याची घोषणाही कंपनीने नुकतीच केली आहे. स्मार्टफोनच्या बाजारात सध्या जोरदार स्पर्धा असताना त्यामध्ये OnePlus कंपनीही मागे नाही. OnePlus 6 या कंपनीच्या फ्लॅगशीप मॉडेलची लाँचिंग डेट, फिचर्स आणि किंमतीबाबत ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर त्याची लाँचिगची तारीख आणि किंमत समजली असून फोनची फिचर्सही समोर आली आहेत. OnePlus 6 च्या ६४ जीबीच्या फोनची किंमत ३६,९९९ रुपये तर १२८ जीबी च्या फोनची किंमत ३९,९९९ रुपये असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करु शकता.

– या फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर देण्यात आला आहे.

– हा फोन वॉटर रेजिस्ट्ंट असल्याने त्याचा पाण्याशी संपर्क आला तरीही तो खराब होणार नाही.

– या फोनचा लूक अतिशय आकर्षक असून त्याची पाठीमागची बाजू सिरॅमिकची असेल असे सांगण्यात आले आहे.

– या फोनमध्ये iPhone X प्रमाणे विशेष नॉच देण्यात आलेला आहे. मात्र ज्यांना हा नॉच नको असेल त्यांना तो लपविता येईल अशी सुविधाही करण्यात आली आहे.

– फोनची बॉडी मेटल आणि काचेची असेल तसेच पुढच्या बाजूचा ९० टक्के भाग हा डिस्प्लेचा असेल.

– एकूण तीन कॅमेरे देण्यात आले असून २० आणि १६ मेगापिक्सलचे रिअर कॅमेरे असतील, तर फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा असेल.

– या फोनला ३४५० मिलिअॅम्पिअर्सची बॅटरी देण्यात आल्याने फोन लवकर डिस्चार्ज होणार नाही.

– ६४ जीबीच्या स्टोरेजमध्ये ६ जीबी की ८ जीबीची रॅम देण्यात येणार याबाबत स्पष्टता नाही.