20 January 2018

News Flash

‘ही’ आहेत जगातील सर्वात महागडी घड्याळे

किंमती ऐकून व्हाल थक्क

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 9, 2017 12:59 PM

हे आहे जगातील सर्वात महागडे घड्याळ

स्टाईल स्टेटमेंटमध्ये महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या घड्याळाची क्रेझ अनेकांना असते. मग अशांसाठी बजारातील विविध ब्रँड सज्ज असतातच. जगातील सर्वात चांगल्या ब्रँडचे घड्याळ आपल्या मनगटावर असावे अशी इच्छा घड्याळाची आवड असणाऱ्यांना असते. मग कधी कोणी गिफ्ट दिलेले तर कधी आपणच काही निमित्ताने खरेदी केलेले घड्याळ या लोकांच्या मनगटावर आपल्याला दिसते. मग यात सोन्याचे, चांदीचे तर कधी हिरेजडित घड्याळही असते. मात्र जगातील सर्वात महाग असणारी घड्याळे तुम्ही कधी पाहिलीयेत? आणि ही घड्याळे कोणाकडे आहेत माहितीये? पाहूयात…

१. चोपार्ड २१० कॅरेट

किंमत – १ अब्ज ६५ कोटीहून अधिक

हे घड्याळ जगातील सर्वात महागडे घड्याळ आहे. यामध्ये २०१ कॅरेटचे रंगीत डायमंड लावलेले आहेत. हे घड्याळ घड्याळापेक्षा ब्रेसलेट घातल्यासारखेच वाटते. हे नेत्रदीपक असे घड्याळ खऱ्या अर्थाने एक अतिशय उत्तम असा दागिना आहे. हे घड्याळ म्हणजे फुलांनी सजवलेली एखादी कलाकृती असल्यासारखे भासते. इतके महाग असलेले हे घड्याळ क्वचितच एखाद्याकडे असणे शक्य आहे.

२. पटेक फिलिप प्लॅटीनम वर्ल्ड टाईम

किंमत – २५ कोटी ४९ लाखांहून अधिक

घड्याळ्यांच्या या किंमती ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हा. पण इतकी महागडी घड्याळे वापरणारे जगात लोक आहेत. हे घड्याळ लिलावात २५ कोटींहून अधिक किंमतीला विकले गेले आहे. जगातील अतिशय महागड्या घड्याळांपैकी एक असणारे हे मनगटी घड्याळ आहे. हे घड्याळ पांढरा, पिवळा, रोझ गोल्ड आणि प्लॅटीनम या फिनिशिंगमध्ये उपलब्ध आहे.

 

३. पटेक फिलिप स्काय मून टर्बिलोन

किंमत – ८ कोटी २८ लाखहून अधिक

पटेक फिलिप कंपनीकडून बनविण्यात आलेले अतिशय जटिल असे हे घड्याळ आहे. याचे डायल निळ्या रंगाचे असून अतिशय अचूक पद्धतीने ते बनविण्यात आले आहे. तारीख आणि चंद्राची स्थिती यामध्ये दिल्याने ते समजण्यासाठी काहीसे अवघड आहे. दिसायला अतिशय सुंदर असलेले हे घड्याळ आधुनिक कलाकृतीचा उत्तम नमुना आहे.

४. हुबलोट ब्लॅक कवियार बँग

किंमत – ६ कोटी ३७ लाखांहून अधिक

हे स्पोर्टी लूक असणारे पूर्णपणे काळ्या रंगाचे घड्याळ आहे. या घड्याळाला ५०१ काळे डायमंड लावण्यात आले आहेत. याशिवाय १८ कॅरेट व्हाईट गोल्डचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. दिसायला अतिशय हटके असणारे हे घड्याळ मोठे उद्योगपती, अभिनेते यांसारखेच लोक खरेदी करु शकतात.

५. ब्रेडेट पॉकेट वॉच १९७० बीए/ १२

किंमत – ४ कोटी ६८ लाख रुपये

सोन्याचे तेही १८ कॅरेटचे स्टायलिश घड्याळ पॉकेट वॉच आहे. याची नक्षी हाताने तयार केलेली असून त्यावरील कारागिरी अतिशय सुंदर आहे. सोन्याचे असले तरीही हे घड्याळ काहीसे चंदेरी रंगात आहे.

First Published on August 9, 2017 12:59 pm

Web Title: most expensive watches in the world
  1. No Comments.