Motorola ने भारतीय मार्केटमध्ये अलिकडेच आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Moto E7 Power लाँच केलाय. Moto E7 Power हा फोन मोटोरोलाचा भारतीय मार्केटमधील सर्वात स्वस्त फोन आहे. आज (दि.26) पहिल्यांदाच हा फोन खरेदी करण्याची संधी असणार आहे. दुपारी 12 वाजेपासून फोनसाठी ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर सेलला सुरूवात होईल. Moto E7 Power हा कंपनीचा E7 सीरिजमधील तिसरा फोन आहे. यापूर्वी कंपनीने Moto E7 आणि E7 Plus आणले होते.

Moto E7 Power स्पेसिफिकेशन्स :-
Moto E7 Power अँड्राइड 10 ओएसवर आधारित असून हा फोन मीडियाटेक हीलियो जी25 प्रोसेसरवर काम करतो. यात 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. हा फोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला असून यात माइक्रोएसडी कार्ड स्लॉट देखील आहे. त्याद्वारे 1TB पर्यंत स्टोरेज वाढवता येते. तर, फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13MP प्रायमरी सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. तर, सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी 5MP क्षमतेचा कॅमेरा आहे. याशिवाय पोट्रेट मोड, पॅनोरामा, फेस ब्युटी, मॅक्रो व्हिजन, मॅन्युअल मोड आणि एचडीआर मोड यांसारखे अनेक प्री-लोडेड कॅमेरा फिचर्सही फोनमध्ये आहेत. तसेच पॉवर बॅकअपसाठी यात 5,000mAh क्षमतेची बॅटरीही आहे.

Moto E7 Power किंमत :-
Moto E7 Power च्या 2GB + 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7 हजार 499 रुपये आहे. तर, 4GB + 64GB मॉडेलची किंमत 8 हजार 299 रुपये आहे. रेड आणि ब्लू अशा दोन रंगांचे पर्याय फोनसाठी आहेत. फ्लिपकार्टवर सेलमध्ये या फोनच्या खरेदीसाठी नो-कोस्ट ईएमआयचा पर्याय आहे, शिवाय अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळेल.