मोटोरोलाने मोटो जी ५ प्लस लाँच केला आहे. आज रात्री ११.५९ मिनिटांनी या फोनची विक्री फ्लिपकार्टवर होणार आहे. फ्लिपकार्टवर मोटो जी ५ प्लसवर बायबॅक गॅरंटी मिळणार आहे. या फोनच्या खरेदीवर १,९९९ ही बायबॅक ऑफर आहे. जर सात-आठ महिन्यांमध्ये तुम्ही मोटोचा कुठलाही फोन एक्सचेंज केला तर निश्चित एक्सचेंज डिस्काउंट मिळणार आहे.

मोटो जी या फोनला ३ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी आहे. तर ४ जीबीच्या व्हेरियंटला ३२ जीबी इंटरनल मेमरी आहे. ३ जीबीची किंमत १४,९९९ रुपये आहे ४ जीबी रॅमची किंमत १६,९९९ इतकी आहे. या फोनमध्ये मोटो डिस्प्ले आणि शेक गेस्चर हे फीचर उपलब्ध आहे. मोटो जी प्लस मध्ये गुगल असिस्टंट हे फीचर देखील उपलब्ध आहे.

या फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर उपलब्ध आहेत. १,५०० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट तसेच एसबीआय कार्डधारकासाठी १० टक्क्यांचा डिस्काउंट उपलब्ध आहेत.

तसेच हा फोन तुम्ही नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेऊ शकता. दर महिन्याला १,८८९ रुपये भरुन तुम्हाला हा फोन विकत घेता येऊ शकतो. ४ जीबी व्हेरियंट घेण्यासाठी तुम्हाला ९ ईएमआय भरावे लागतील.

या फोनचे फीचर्सः

– डिस्प्ले – ५.२ इंच, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३
– प्रोसेसर – २.० गीगाहर्टज, क्वालकॉम स्नॅपड्र्रॅगन ६२५ प्रोसेसर, अॅड्रिनो ५०६ जीपीयू
– मेमरी – ३ जीबी व्हेरियंट साठी १६ जीबी आणि ४ रॅमसाठी ३२ जीबी १३२ जीबी एक्सपांडेबल मेमरी
– बॅटरी – ३,००० एमएएच बॅटरी
– कनेक्टिविटी – ४ जी एलटीई सपोर्ट, वायफाय आणि ब्लूटूथ