मोटोरोलाने काही दिवसांपूर्वीच Moto G 5G हा स्मार्टफोन भारतात केला असून हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5जी स्मार्टफोन ठरलाय. हा स्मार्टफोन आज (दि.12) पहिल्यांदाच खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीने या फोनसाठी पहिल्यांदाच फ्लॅश-सेलचं आयोजन केलं आहे. आतापर्यंत OnePlus Nord हा देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन म्हणून ओळखला जात होता. Moto G 5G हा स्मार्टफोन यापूर्वी युरोपमध्ये लाँच करण्यात आला होता. तिथे या फोनची किंमत जवळपास 26,300 रुपये आहे, पण भारतातील फोनची किंमत यापेक्षाही कमी आहे. Moto G 5G या स्मार्टफोनच्या फ्लॅश-सेलसाठी आज दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेलला सुरूवात झाली आहे.
Moto G 5G किंमत :-
केवळ फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइटवरुनच हा फोन खरेदी करता येईल. मोटोरोलाने या स्वस्त 5जी स्मार्टफोनची भारतातील किंमत 20,999 रुपये ठेवली आहे. एचडीएफसी बँकेच्या कार्डद्वारे फोन खरेदी करणाऱ्यांना 1,000 रुपयांची सवलतही मिळेल. हा फोन व्हॉल्केनिक ग्रे आणि फ्रोस्टेड सिल्वर अशा दोन कलर व्हेरिअंटमध्ये खरेदी करता येईल.
Moto G 5G स्पेसिफिकेशन्स :-
Moto G 5G मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) LTPS डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर असून अँड्रॉइड 10 चा सपोर्ट देण्यात आला आहे. 6 जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे, तर 8 मेगापिक्सेलचा वाइड अँगल आणि तीसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.
Moto G 5G ची बॅटरी :-
मोटोरोलाच्या या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे, ही बॅटरी 20W च्या टर्बो पॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनसोबत कनेक्टिव्हिटीसाठी 5G, NFC, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11ac, 3.5mm हेडफोन जॅक, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि जीपीएससोबत बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. वॉटर रेसिस्टंटसाठी फोनला IP52 रेटिंग मिळाली असून गुगल असिस्टंटसाठी फोनमध्ये वेगळं बटणही दिलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 7, 2020 12:30 pm