Lenovo ची मालकी असलेल्या मोटोरोला (Motorola )कंपनीने भारतीय बाजारात अलिकडेच Moto G30 आणि Moto G10 Power हे दोन लेटेस्ट बजेट स्मार्टफोन लाँच केलेत. मोटोरोलाच्या या दोन्ही फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि फिंगरप्रिंट सेन्सर असून स्टॉक अँड्रॉईड 11 चा सपोर्ट आहे. शिवाय सुरक्षेसाठी यामध्ये ThinkShield या खास टेक्नॉलॉजीचा वापरही करण्यात आला आहे. यातील Moto G30 स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीसह शानदार फिचर्स दिले आहेत. हा फोन आज (दि.17) पहिल्यांदाच सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. दुपारी 12 वाजेपासून ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेल सुरू होईल. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर अनेक शानदार ऑफर्सही आहेत.

Moto G30 स्पेसिफिकेशन्स :-
Moto G30 मध्ये अँड्रॉइड 11 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज आहे. मेमरी कार्डच्या मदतीने यातील स्टोरेजही 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. तसेच, फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील चारही कॅमेरे अनुक्रमे 64 मेगापिक्सेल मेन लेन्स, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सेल डेफ्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी यामध्ये 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0, NFC, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि टाइप सी पोर्ट मिळेल. शिवाय फोनमध्ये 20W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे.

आणखी वाचा- Redmi Note 10 Pro चा आज पहिलाच ‘सेल’, किंमत 15 हजार 999 रुपये

Moto G30  किंमत :-
Moto G30 ची भारतात किंमत 10 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन डार्क पर्ल (Dark Pearl) आणि पास्टेल स्काय कलर (Pastel Sky Colours) अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजमध्ये मिळेल.