मोटोरोला कंपनीचा नवीन Moto G40 Fusion हा स्मार्टफोन आज (दि.१) पहिल्यांदाच खरेदी करण्याची संधी आहे. गेल्या आठवड्यात लाँच झालेला हा दमदार स्मार्टफोन आज दुपारी १२ वाजेपासून फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेलमध्ये उपलब्ध होत आहे. Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसर असलेला हा भारतातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

स्पेसिफिकेशन्स :
Moto G40 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD Plus HDR10 डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन अँड्राइड 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर कार्यरत असून क्वॉलकॉम Snapdragon 732G या दमदार प्रोससरचा सपोर्टही आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूला ट्रिपल रिअर कॅमेरा अर्थात तीन कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 64MP क्षमतेचा आहे. 64MP + 8MP + 2MP असा बॅकपॅनलवर कॅमेऱ्याचा सेटअप असेल. तर, सेल्फीसाठी यात समोरच्या बाजूला 16MP क्षमतेचा कॅमेराही आहे. याशिवाय फोनमध्ये कंपनीने तब्बल 6,000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी दिली असून ही बॅटरी टर्बोपॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.0, 3.5mm चा ऑडिओ जॅक, वाय-फाय, NFC, युएसबी टाईप-सी पोर्ट आणि रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर यांसारखे फिचर्सही आहेत.

किंमत :-
Moto G40 Fusion च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. तर, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 15 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन डायनेमिक ग्रे आणि फ्रॉस्टेड शँम्पेन अशा दोन रंगांच्या पर्यायंमध्ये खरेदी करता येईल. लाँचिंग ऑफरअंतर्गत फ्लिपकार्टवरील सेलमध्ये या फोनवर आकर्षक डिस्काउंटही मिळेल.