मोटोरोलाने मोटो जी लाँच केला आहे. आज रात्री ११.५९ मिनिटांनी या फोनची विक्री ऑनलाइन होणार आहे. या फोनच्या खरेदी एचडीएफसी क्रेडिटकार्डद्वारे केली तर १,००० रुपये ही बायबॅक ऑफर आहे. तसेच पाच हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंटदेखील मिळणार आहे. अॅमझॉनच्या प्राइम मेंबरसाठी १,००० रुपयांचा बायबॅक डिस्काउंट आहे. मागील महिन्यात मोटोने जी ५ प्लस लाँच केला. गुणवत्ता आणि किमतीचा सुंदर मिलाफ या फोनद्वारे आपल्याला पाहायला मिळेल असे मोटोरोलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. जी ५ आणि जी ५ प्लसचे डिजाइन सारखेच आहे. दोन्ही फोनला फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. परंतु जी ५ हे जी ५ प्लसचे छोटे व्हर्जन आहे. जी ५ ची स्क्रीन ५ इंची आहे तर जी ५ प्लसची स्क्रीन ५.२ इंच आहे. जी ५मध्ये १.४ जीएचझेड स्नॅपड्रॅगन ४३० हे प्रोसेसर, ३ जीबी रॅमची ऑपरेटिंग सिस्टम आहे. या फोनची इंटरनल मेमरी १६ जीबी आहे तर १३२ जीबी एक्सपांडेबल मेमरी आहे. जी ५ ला २८०० एमएमएचची बॅटरी असून १३ मेगापिक्सल कॅमेरा आहे. ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्यामुळे सेल्फीदेखील चांगले येतील. मोटो जी ५ ची किंमत ११,९९९ रुपये आहे.

मोटो जी ५ प्लसची वैशिष्ट्ये-
– डिस्प्ले – ५.२ इंच, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३
– प्रोसेसर – २.० गीगाहर्टज, क्वालकॉम स्नॅपड्र्रॅगन ६२५ प्रोसेसर, अॅड्रिनो ५०६ जीपीयू
– मेमरी – ३ जीबी व्हेरियंट साठी १६ जीबी आणि ४ रॅमसाठी ३२ जीबी १३२ जीबी एक्सपांडेबल मेमरी
– बॅटरी – ३,००० एमएएच बॅटरी
– कनेक्टिविटी – ४ जी एलटीई सपोर्ट, वायफाय आणि ब्लूटूथ

– किंमत १४,९९९ रुपये

दोन्ही फोनचे फीचर्स सारखेच आहेत. केवळ स्क्रीन साइज आणि बॅटरीच्या साइजमध्ये किंचितसा फरक आहे. परंतु दोन्हीच्या किमती ३,००० रुपयांचा फरक आहे.