X

Moto G6 Plus : १५ मिनिटांच्या चार्जिंगवर ७ तास चालणारा स्मार्टफोन

अॅमेझॉन इंडियावर हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर मोटो हब्स आणि मोटोरोला हे याचे रिटेलर्स आहेत.

स्मार्टफोनचा वापर वाढल्याने तो लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या सध्या अनेकांना भेडसावते. मग सतत तो चार्जिंगला लावा नाहीतर पोर्टेबल बॅटरी घेऊन फिरा असे करावे लागते. मात्र याचाच विचार करत आता मोटोरोला कंपनीने आपला नवीन फोन लाँच केला आहे. Moto G6 Plus असे या फोनचे नाव असून नुकताच तो भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत २२,९९९ रुपये असून तो नुकताच आलेल्या Xiaomi Poco F1 ला टक्कर देण्याची शक्यता आहे.

याआधी कंपनीने आपला Moto G6 आणि G6 Play हे फोन जूनमध्ये लाँच केले होते. Moto G6 Plus या फोनला ६ जीबी रॅम असून त्याची मेमरी ६४ जीबी असेल. ही मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. अॅमेझॉन इंडियावर हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर मोटो हब्स आणि मोटोरोला हे याचे रिटेलर्स आहेत. हा फोन अगदी कमी वेळात जास्त चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे.

त्याशिवाय हा मोबाईल पेटीएमच्या माध्यमातून मॉलमधूनही खरेदी करणार आहेत. या माध्यमातून फोन खरेदी केल्यास ३ हजार रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. रिलायन्स जिओची सर्व्हीस वापरणाऱ्या ग्राहकांना ४,४५० रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. मात्र त्यासाठी जिओ ग्राहकांना १९८ आणि २९९ रुपयांचा रिचार्ज करावे लागणार आहे. हा फोन इंडिगो आणि गोल्ड रंगात उपलब्ध आहे. या फोनला १२ आणि ५ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे.