News Flash

Motorola ने लाँच केला 75 इंचाचा 4K UHD स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर 10 तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे युजरला अतिशय दर्जेदार व सजीव वाटणार्‍या चलचित्राचा आनंद घेता येणार

‘मोटोरोला’ने भारतात नवा 4K UHD स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. 75 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह या टीव्हीमध्ये डॉल्बी व्हिजन आणि HDR 10 चा सपोर्ट देण्यात आला आहे. अँड्रॉइडच्या पाय या आवृत्तीवर चालणाऱ्या या टीव्हीमध्ये गुगल असिस्टंट इनबिल्ट अवस्थेत असून युजर याच्या मदतीने व्हॉईस कमांडद्वारे सर्च करू शकतो. याशिवाय यात 30W बॉटम फायरिंग स्पीकर्स आहेत. तसेच दर्जेदार साउंड आउटपुटसाठी यामध्ये DTS सराउंड साउंड टेक्नॉलजी आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आहे.

यात डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर 10 तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्यामुळे युजरला अतिशय दर्जेदार व सजीव वाटणार्‍या चलचित्राचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात डॉल्बी ऑडिओ आणि डीटीएस सराऊंड साऊंड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.

किंमत –
ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे टीव्ही खरेदी करता येईल. फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर हा टीव्ही 1,19,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर या टीव्हीच्या खरेदीवर SBI च्या कार्डधारकांना 10 टक्के आणि अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 5 टक्के डिस्काउंट मिळेल. टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ यांसारखे एंटरटेनमेंट फीचर्स आहेत. क्वॉडकोर CA53 प्रोसेसर असलेल्या या टीव्हीमध्ये 16 जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज दिलेले आहे. हा टीव्ही लाँच होईपर्यंत मोटोरोलाकडे 32 इंच ते 65 इंचापर्यंतचेच टीव्ही उपलब्ध होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 9:23 am

Web Title: motorola 75 inch 4k smart tv launched in india know price specifications and more sas 89
Next Stories
1 अन् सांबराने केली शिकाऱ्याचीच शिकार
2 विमानावरील ‘इक ओंकार’ चिन्हाद्वारे एअर इंडियाकडून गुरु नानक यांना अनोखे अभिवादन
3 ‘ड्रायव्हिंग लायसन्स’बाबत महत्त्वाचं वृत्त, नवा नियम महाराष्ट्रात लागू
Just Now!
X