मोटोरोला इंडियाने भारतात आपला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Moto E7 Power लाँच केला. Moto E7 Power हा फोन भारतात वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले आणि ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपसह लाँच झाला आहे. या स्वस्त स्मार्टफोनची भारतीय बाजारात Redmi 9i, Infinix Smart 5 आणि Realme C15 यांसारख्या फोनसोबत टक्कर असेल.
Moto E7 Power स्पेसिफिकेशन्स :-
Moto E7 Power मध्ये अँड्रॉइड 10 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ मॅक्स व्हिजन डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर, 4 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा तर दुसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच पुढील बाजूला 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही आहे. कॅमेरासाठी पोट्रेट, पॅनोरमा, फेस ब्युटी असे अनेक मोड्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 5.0, GPS/A-GPS, FM रेडिओ, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जॅक मिळेल. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी 14 तासांचा व्हिडिओ प्ले बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे.
Moto E7 Power ची किंमत :-
Moto E7 Power हा फोन भारतात दोन व्हेरिअंटमध्ये लाँच झालाय. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 7 हजार 499 रुपये आहे. तर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 299 रुपये आहे. हा फोन 26 फेब्रुवारीपासून फ्लिपकार्ट आणि अन्य वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 19, 2021 3:56 pm