News Flash

‘मोटोरोला’चा Moto G 5G झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत आणि फिचर्स

किंमतीत झाली कपात

भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन Moto G 5G आता अजून स्वस्त झाला आहे. मोटोरोलाने या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. Motorola ने Moto G 5G हा स्मार्टफोन भारतात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँच केला होता. Moto G 5G लाँच होईपर्यंत OnePlus Nord हा देशातील सर्वात स्वस्त 5जी फोन म्हणून ओळखला जात होता. किंमतीत कपात झाल्यामुळे आता 20 हजार रुपयांपेक्षा कमी बजेट असलेले ग्राहकही हा जबरदस्त 5G स्मार्टफोन खरेदी करु शकतील. नवीन किंमत जाणून घेण्याआधी जाणून घेऊया कसा आहे Moto G 5G :-

Moto G 5G डिस्प्ले :-Moto G 5G मध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) LTPS डिस्प्ले आहे. याशिवाय फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर असून अँड्रॉइड 10 चा सपोर्ट देण्यात आला आहे.

Moto G 5G स्टोरेज :- 6 जीबी रॅम असलेल्या या फोनमध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज असून माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

Moto G 5G कॅमेरा :- या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे, तर 8 मेगापिक्सेलचा वाइड अँगल आणि तीसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे.

Moto G 5G बॅटरी :- मोटोरोलाच्या या शानदार फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे, ही बॅटरी 20W च्या टर्बो पॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Moto G 5G कनेक्टिव्हिटी :- फोनसोबत कनेक्टिव्हिटीसाठी 5G, NFC, ब्लूटूथ 5.1, वाय-फाय 802.11ac, 3.5mm हेडफोन जॅक, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि जीपीएससोबत बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. वॉटर रेसिस्टंटसाठी फोनला IP52 रेटिंग मिळाली असून गुगल असिस्टंटसाठी फोनमध्ये वेगळं बटणही दिलं आहे.

Moto G 5G किंमतीत झाली कपात:- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लाँचिंगवेळी मोटोरोलाने या फोनची किंमत 20,999 रुपये ठेवली होती. आता कंपनीने फोनच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे हा फोन 18,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टवरुन ग्राहक Moto G 5G हा फोन खरेदी करु शकतात. याशिवाय २० जानेवारीपासून फिल्पकार्टवर Flipkart Big Saving Days Sale सुरू होत आहे. या सेलमध्ये फोनच्या खरेदीवर अतिरिक्त 10 टक्के डिस्काउंटही मिळेल. Flipkart Plus युजर्ससाठी हा सेल 19 जानेवारी रात्री 12 वाजेपासून सुरू होत आहे, तर अन्य युजर्ससाठी 20 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत हा सेल असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 11:36 am

Web Title: motorola moto g 5g to be available at rs 17999 in flipkart sale sas 89
Next Stories
1 Samsung Galaxy M02s स्मार्टफोनचा आजपासून ‘सेल’, जाणून घ्या किंमत व ऑफर्स
2 चुकूनही Facebook किंवा Twitter वर करु नका ‘तक्रार’, पोलिसांनी दिली ‘वॉर्निंग’
3 Signal येताच बंद झालं ‘मेड इन इंडिया अ‍ॅप Hike’, कोट्यवधी युजर्सनी केलं होतं डाउनलोड
Just Now!
X