01 March 2021

News Flash

Moto G9 Power स्मार्टफोन झाला लाँच, मिळेल 6000mAh ची बॅटरी आणि 64MP कॅमेरा

पॉवरफुल बॅटरीसह होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ट्रिपल रिअर कॅमेरा

Motorola कंपनीने आज (दि.8) आपला लेटेस्ट स्मार्टफोन Moto G9 Power भारतात लाँच केला. 4जीबी रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 11,999 रूपये ठेवण्यात आली आहे. 15 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवरुन या फोनची विक्री सुरू होईल. Moto G9 Power मध्ये तब्बल 6000 mAh क्षमतेच्या पॉवरफुल बॅटरीसह होल-पंच डिस्प्ले डिझाइन आणि ट्रिपल रिअर कॅमेरा यांसारखे अनेक खास फिचर्स आहेत. जाणून घेऊया सविस्तर :-

Moto G9 Power स्पेसिफिकेशन्स :-
Moto G9 Power फोनमध्ये 6.8 इंचाचा एचडी+ IPS डिस्प्ले असून स्नॅपड्रॅगन 662 SoC चिपसेट प्रोसेसर आहे. ड्युअल नॅनो सिम कार्ड्सना सपोर्ट करणारा हा फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रिअर कॅमेरे आहेत. यात 64 मेगापिक्सेलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासोबत एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो आणि एक 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल.

Moto G9 Power बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी :-
रिअर फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कंपनीने फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची मोठी आणि दमदार बॅटरी दिली आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G LTE, वाय-फाय 802.11 ac, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, युएसबी टाइप-C आणि 3.5 mm हेडफोन यांसारखे पर्याय आहेत. हा फोन इलेक्ट्रिक व्हायोलेट आणि मेटालिक सेज ( Electric Violet and Metallic Sage) अशा दोन कलर्सच्या पर्यायांत उपलब्ध असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 3:36 pm

Web Title: motorola moto g9 power launched in india with a big 6000 mah battery check price specifications and more sas 89
Next Stories
1 रक्तदाब नियंत्रणात नाही? मग आहारात करा गवारीचा समावेश
2 Asus ROG Phone 3 गेमिंग स्मार्टफोनवर डिस्काउंट; स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या डिटेल्स
3 1500 रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, 8GB रॅमसह एकूण सहा कॅमेरे
Just Now!
X