Moto Razr 2019 ची प्रतीक्षा अखेर या महिन्यात संपणार आहे. कंपनी आपला फोल्डेबल स्मार्टफोन भारतात 16 मार्च रोजी लाँच करणार आहे. क्लॅमशेल डिझाइन असलेल्या या फोनची चाचणी गेल्या नोव्हेंबरपासून सुरू आहे. अमेरिकेत हा फोन यापूर्वीच लाँच झालाय. हा फोन म्हणजे कंपनीच्या Moto Razr या एकेकाळी (2004 मध्ये) लोकप्रिय ठरलेल्या स्मार्टफोनचं पुनरागमन मानलं जातंय. मोटोचा हा फोन भारतीय बाजारात सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड, Samsung Galaxy Z Flip आणि huawei mate x या स्मार्टफोन्सना टक्कर देईल.

आतापर्यंत लाँच झालेल्या फोल्डेबल स्मार्टफोनच्या तुलनेत हा फोल्डेबल फोन बराच वेगळा आहे. हा फोन व्हर्टिकली (उभा) फोल्ड होतो. यापूर्वी वर्षाच्या सुरूवातीलाच मोटोरोलाचे उपाध्यक्ष(ग्लोबल प्रोडक्ट्स) डॅन कॅरी यांनी सॅमसंग किंवा Huawei या कंपन्यांची स्टाइल कॉपी न करता स्वतःच्या वेगळ्या स्टाइलमध्ये नव्या प्रकारचा फोल्डेबल फोन लाँच केला जाईल असं सांगितलं होतं. जुन्या मोटो रेझरनुसार कंपनीने या फोनचं डिझाइन ठरवलंय.‘मोटो रेझर’ 2019 मध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्यात. यातील एक स्क्रीन फोनच्या आतील बाजूला आणि दुसरी स्क्रीन बाहेरच्या बाजूला आहे. अनफोल्डेड कंडिशनमध्ये आतील स्क्रीनचं आकारमान 6.2 इंच असतं. यात फ्लेक्सिबल OLED इंटर्नल डिस्प्ले, 21:9 सिनेमाव्हिजन अॅस्पेक्ट रेशोसह आहे. तर , फोन फोल्ड झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला 2.7 इंच स्क्रीन असते. हा बाहेरचा डिस्प्ले युजर्सना नोटिफिकेशन्स मिळतील. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर बाहेरच्या पॅनलवरच आहे.

फोटोग्राफीसाठी दोन कॅमेरे –
फोटॉग्राफीसाठी या फोनमध्ये दोन कॅमेरे आहे. यामध्ये नाइट व्हिजन पर्यायासह 16 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट फेसिंग कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा इंटर्नल कॅमेरा आहे. हा फोन अँड्रॉइड 9 पाय आउट-ऑफ-द-बॉक्सवर कार्यरत असेल, तसंच हा फोन ई-सिम कार्डलाही सपोर्ट करतो. हा फोन 6जीबी रॅम आणि 128जीबी इंटर्नल स्टोरेज क्षमतेसह लाँच करण्यात आला असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट प्रोसेसर आहे. अमेरिकेत एका इव्हेंटमध्ये हा फोन यापूर्वीच लाँच करण्यात आला असून 1499 डॉलर इतकी याची अमेरिकेत किंमत ठरवण्यात आली आहे. तर, भारतात हा फोन 16 मार्च रोजी लाँच होणार आहे. भारतात या फोनची किंमत कित असेल याबाबत अद्याप माहिती नाही, पण नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी Z फ्लिपच्या किंमती ऐवढीच याची किंमत असण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी Z फ्लिपची भारतात किंमत एक लाख नऊ हजार 999 रुपये आहे.