News Flash

Jio युजर्सना ‘डबल डेटा अँड व्हॅलिडिटी’ची ऑफर, ‘मोटो’च्या फोल्डेबल फोनसाठी प्री-बुकिंगला सुरूवात

'मोटोरोला'चा आयकॉनिक Motorola Razr 2019 हा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच...

‘मोटोरोला’ने सोमवारी(दि.16) आपला आयकॉनिक Motorola Razr 2019 हा फोल्डेबल स्मार्टफोन लाँच केला. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनबाबत चर्चा रंगली होती. हा फोन म्हणजे कंपनीच्या Moto Razr या एकेकाळी (2004 मध्ये) लोकप्रिय ठरलेल्या स्मार्टफोनचं पुनरागमन आहे. फोनच्या प्री-बुकिंगला सोमवारपासून सुरूवात झाली असून 2 एप्रिलपासून विक्री सुरू होईल. फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून फोनसाठी प्री-बुकिंग सुरू आहे. मोटोरोलाच्या या फोल्डेबल फोनची थेट स्पर्धा सॅमसंग गॅलेक्सी Z फ्लिपसोबत असेल. भारतात सॅमसंगचा हा फोल्डेबल स्मार्टफोन गेल्या महिन्यातच लाँच झालाय. मोटोरोलाने या हँडसेटसाठी फ्लिपकार्ट, सिटी बँक आणि जिओसोबत भागीदारी केलीये. Motorola Razr 2019 हा फोन सिटीबँक क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10,000 रुपये कॅशबॅक ऑफर आहे. याशिवाय 24 महिन्यांसाठी ‘नो कॉस्ट ईएमआय’ची ऑफरही आहे. तर, जिओच्या 4,999 रुपयांच्या रिचार्जवर डबल डेटा अँड डबल व्हॅलिडिटी ऑफर मिळेल. म्हणजे एकूण 1.4 टीबी डेटा आणि 2 वर्षे वैधतेचा लाभ युजर्सना घेता येईल. याशिवाय कंपनीकडून एका वर्षासाठी आकर्षक डिस्काउंटसह मोटोकेअर अॅक्सिडेंट डॅमेज प्रोटेक्शन प्लॅनही ऑफर करत आहे. फोन खरेदी केल्याच्या 30 दिवसांमध्ये हा प्लॅन खरेदी करता येईल.

Motorola Razr 2019: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स :-
6.2 इंच फ्लेक्सिबल ओलेड एचडी+ (876×2142 पिक्सल) डिस्प्ले असून डिस्प्ले पॅनलला पूर्ण फोल्ड करता येते. फोनमध्ये एक सेकंडरी 2.7 इंच ओलेड क्विक व्ह्यू स्क्रीन आहे. या स्क्रीनचा वापर सेल्फी घेण्यासाठी , नोटिफिकेशन पाहण्यासाठी आणि म्यूझिक कंट्रोल व गुगल असिस्टंटसाठी करता येतो. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आणि 6 जीबी रॅम आहे. याशिवाय नाइट व्हिजन मोडसह 16 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून अंधारातही ब्राइट फोटो घेता येईल असा कंपनीचा दावा आहे. कॅमेऱ्यामध्ये ऑटो सीन डिटेक्शन, पोर्ट्रेट लायटिंग आहे. फोन फोल्ड केल्यानंतर हा कॅमेरा सेल्फीसाठीही वापरता येतो. तसेच, हँडसेटच्या मुख्य डिस्प्ले नॉचच्या वर एक 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. 205 ग्रॅम वजन असलेल्या या फोनमध्ये 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज मेमरी असून हा फोन अँड्रॉइड 9 पायवर कार्यरत असेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4जी, वाय-फाय 802.11 एसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि युएसबी टाइप-सी यांसारखे फीचर्स आहेत. तर, 2510mAh क्षमतेची 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली बॅटरीही आहे. ही बॅटरी एक दिवसाचा बॅकअप देईल असा कंपनीचा दावा आहे.

किंमत :-
भारतात नव्या Motorola Razr 2019 ची किंमत 1 लाख 24 हदार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनच्या प्री-बुकिंगला सोमवारपासून सुरूवात झाली असून 2 एप्रिलपासून विक्री सुरू होईल. फ्लिपकार्ट आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून फोनसाठी प्री-बुकिंग सुरू आहे. अमेरिकेत या स्मार्टफोनची किंमत 1,500 डॉलर (जवळपास 1 लाख 11 हजार रुपये) आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 9:21 am

Web Title: motorola razr 2019 launched india know offers price specifications and all details sas 89
Next Stories
1 Coronavirus: विषाणू नष्ट करण्यासाठी प्राध्यापकाने पेपर मायक्रोवेव्हमध्ये गरम केले, सर्व उत्तरपत्रिका जळून खाक
2 “आम्ही पण भारतीय, आम्हाला करोना म्हणणं बंद करा”
3 अ‍ॅडॉल्फ हिटलरचं आत्मचरित्र अ‍ॅमेझॉनने केलं बॅन
Just Now!
X