तोंड येणे हा विकार तसा प्रत्येकाला कधी ना कधी होतोच. स्टोमॅटायटिस किंवा माऊथ अल्सर या नावाने वैद्यकीय भाषेत ओळखला जाणारा हा आजार. तोंडात विशेषतः ओठांची आतील बाजू, जीभ, टाळू या भागांवर सूज येऊन ती लालबुंद होतात. तोंडाच्या आतली त्वचा सोलवटून निघते आणि संपूर्ण तोंड आतून घशापर्यंत लाल होते. घशाच्या आतमध्ये किंवा जिभेवर पांढरट थर जमा होतो. जिभेच्या कडा खडबडीत होऊन त्यावर फोड येतात. अनेकदा तोंडात पांढरट, पिवळसर गोल जखमा तयार होतात. यामुळे कुठल्याही चवीचे कोणतेही पदार्थ खाताना जिभेची, हिरड्यांची टाळ्याची खूप आग होते, आवंढा गिळतानाही त्रास होतो.

नेमकी काय कारणे असतात-

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
  • कुपोषण- आहारामधून पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे आणि कॅलरीज खूप कमी प्रमाणात मिळाल्याने.
  • अॅनिमिया- शरीरात लोहाची कमतरता असल्याने हिमोग्लोबिन कमी होऊन
  • अयोग्य आहार, विशेषतः चौरस आहाराऐवजी जंकफूड खाणे
  • आहारात नायसीन, रायबोफ्लेवीन, फोलेट अ‍ॅसिड, सायनोक्लोमाइन या जीवनसत्वांची कमतरता
  • दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची आरोग्यदृष्ट्या योग्य दैनंदिन स्वच्छता न राखणे,
  • दीर्घकाळ अँटिबायोटिक्स, पेनकिलर्स घेणे
  • कर्करोगाच्या केमोथेरपीमध्ये
  • तंबाखू, गुटखा, मावा, मिसरी अशा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर, अतिरिक्त मद्यपान
  • चहा, कॉफीसारखी अती गरम पेये जास्त प्रमाणात घेणे
  • कॅफीन आणि आम्लता जास्त असलेली कोलड्रिंक्स किंवा तत्सम शीतपेये
  • मानसिक ताणतणाव
  • अपुरी, अनियमित झोप
  • अती मसालेदार, तिखट अन्नपदार्थ
  • प्रतिकारशक्तीचा अभाव
  • स्ट्रॉंग टूथपेस्ट

तोंड येऊ नये म्हणून-

  • नियमितपणे तोंडाची आंतरबाहय़ स्वच्छता ठेवावी.
  • पान, तंबाखू, गुटखा, मद्यपान, गरम चहा-कॉफी वर्ज्य करावे
  • चौरस आहार असावा. त्यात जीवनसत्त्व आणि फायबर्सचा समावेश असावा.
  • जीवनसत्वे- सर्व प्रकारची तृणधान्ये, हातसडीचा तांदूळ, कोंडयासकट गहू (होल ग्रेन), मोड आलेली कडधान्ये, दूध, ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा आहारात समावेश असावा.
    गर्भावस्थेतील स्त्रिया, थायरॉइड ग्रंथीचा विकार, संतती नियमनाच्या गोळ्यांचे सेवन करणाऱ्यांना या जीवनसत्त्वांची अधिक आवश्यकता असते.
  • दिवसभरातून किमान दोन ते तीन लिटर पाणी प्यावे
  • नियमित वेळेस, रोजच्या रोज, पुरेशी झोप घेणे.
  • मानसिक तणाव नियोजन करणे. त्यासाठी मेडीटेशन, ध्यान यांचा वापर करावा.

उपाय- सतत तोंड येणे आणि त्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे. क्वचित प्रसंगी हा तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात असते. घरगुती आणि ऐकीव उपाय करण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने तोंडाला आतून लावण्याची आणि पोटात घेण्याची औषधे घ्यावीत. वर्तमानपत्रे आणि टीव्हीवरील जाहिरातीत दाखवल्या जाणाऱ्या औषध मलमांचा बहुतेक वेळेस उपयोग होत नाही.

 

-डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन