युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) बाजारात दाखल झाल्यामुळे डिजिटल क्षेत्रात अधिकाधिक स्पर्धा निर्माण झाली आहे. अल्पवधीतच व्हिसा आणि मास्टरकार्डला मागे टाकत युपीआयने भारतीय बाजारपेठेमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तर डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांच्या व्यवहारात युपीआयने अर्धा हिस्सा काबीज केला आहे.

राष्ट्रीय बँकेच्या गेल्या महिन्याच्या माहितीनुसार, डेबिड कार्ड आणि क्रेडिट कार्ड स्वॅप करून झालेल्या आर्थिक व्यवहारांमध्ये अर्धा वाटा यूपीआयचा आहे. मागील ३० वर्षांमध्ये भारतीय बाजारपेठेत मास्टरकार्डने व्यवहार वाढले होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआयने भारतातील व्यवहार वाढले आहेत. भारतीय युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) मोबाईलवर सहजगतेने उपलबद्ध असल्यामुळे विमान तिकीटांसह इतर सेवांसाठी पैसे जमा करता येते. महत्वाचे म्हणजे यूपीआय ही एक अशी व्यवस्था आहे ज्यामुळे अनेक बँकाच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे एकत्र आणून सोयिस्कर पैसे पाठवणे, रक्कम भरणे, खरेदी एकाच ठिकाणी एकाच अॅपमध्ये उपलब्ध होते.

भारतीय बँकाची नियंत्रण असलेल्या शिखर बँकेने ऑगस्ट २०१६ मध्ये भारताच्या ऑनलाईन बाजारपेठेमध्ये यूपीआय आणले. अमेरिकेतील राष्ट्रीय माहिती सर्विसच्या (फिडेलिटी नॅशनल)डिसेंबर २०१७मधील रिपोर्टनुसार, युपीआयमुळे रिअल टाईम पैशांचा व्यवहार होत आहे. त्यामुळे भारतामध्ये ऑनलाईन बाजरा वाढला जाईल. भविष्यात भारतीय जास्तीत जास्त याचा सजगतेने वापर करतील.

फिडेलिटी नॅशनलनुसार, जगातील 40 देशांमध्ये भारताच्या युपीआय पेमेंट सिस्टीमने नवा उच्चांक गाढला आहे. सध्या ग्राहकांनी पाचव्या क्रमांकाची पसंती या व्यवहाराला दिली आहे. चीनची इंटरनेट बँकींग पेमेंट सर्व्हिस दोन क्रमांकावर आहे तर केनियाची पेमेंट बँक चौथ्या क्रमांकावर आहे. मागील ३० वर्षांमध्ये भारतीय बाजारपेठेत मास्टरकार्डने व्यवहार वाढले होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये यूपीआयने भारतातील व्यवहार वाढले आहेत. सध्या यूपीआयद्वारे ती सर्व कामे करता येतात जी नेटबँकिंगने करता येतात. (पैसे पाठवणे, पैसे स्वीकारणे, रीचार्ज, बिल भरणा, तिकीट आरक्षण,खरेदी,इ.) सध्या मोबाइल वॉलेट प्रसिद्ध असले तरी यूपीआयमधील सोपेपणा लक्षात येताच याचा वापर नजीकच्या काळात नक्कीच वाढेल आणि इतर ठिकाणी जसे की टॅक्सी, कॅब, रिक्षा अशा ठिकाणी सुद्धा यूपीआयचा वापर होईल.