Maharashtra Security Force Recruitment : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाने पुरूष सुरक्षा रक्षक पदासाठी सात हजार जागांसाठी भरती प्रक्रीया सुरू केली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीनं असेल. ७००० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०२० आहे. इच्छुक उमेदवारांना बारावीत किमान ५० टक्के गुण असणं अनिवार्य आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमाह १७ हजार रूपयांचं वेत दिलं जाईल. शिवाय इतर भत्तेही मिळणार आहेत.

LIC मध्ये नोकरीची संधी, पगार प्रतिमहिना ५७,००० रूपये

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
Property Transactions in Mumbai Pune Thane Raigad and Nagpur Contribute more than 30 Crore in Stamp Duty Revenue
घरे घेण्यासाठी कोणत्या शहरांना पसंती?… वाचा सविस्तर
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’

भरतीची ठिकाणे मुंबई आणि नागपूर येथे असणार आहे. बारावी पास असणाऱ्या १८ ते २८ वर्षांच्या तरुणांना यासाठी अर्ज करता येणार आहे. प्रवेश शुल्क २५० रूपये आहे. भरती प्रक्रियेमधून सुरक्षा रक्षक पदाकरिता निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारांना दोन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर महामंडळाच्या सेवेत कंत्राटी तत्वावर रुजू करण्यात येणार आहे. तसेच भरती झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यात कर्तव्यासाठी जावं लागणार आहे.

Good News : स्टाफ सिलेक्शनमधून भरणार ११५७ जागांची भरती

अर्ज करण्यासाठी इथं क्लीक करा 
असा करा अर्ज –

  • MSSC चे अधिकृत संकेतस्थळ mahasecurity.gov.in वर जा
  • ‘Recruitment’ च्या लिंक वर क्लिक करा
  • आता नव्या पेजवर Apply Online For Post of Security Guard या पर्यायावर क्लिक करा
  • क्लिक करताच अॅप्लिकेशन फॉर्मचं पेज उघडेल
  • आता तेथे विचारलेल्या डिटेल्स (तपशील) भरत जा
  • अर्ज [Register] केल्यानंतर उमेदवारास Application ID प्राप्त होईल. हा Application ID पुढील सर्व प्रक्रियेसाठी महत्वाचा असलेले उमेदवारांनी तो काळजीपूर्वक जतन करावा.
  • शुल्क भरल्यानंतर आपले छायाचित्र स्कॅन करून अपलोड करा.

महत्वाची बातमी : दहावी पास असाल तर रेल्वेत नोकरीची संधी; परीक्षेविना होणार निवड