लॉकडाउनपासून टेलिकॉम कंपन्या सातत्याने नवनवीन प्लॅन लाँच करत आहेत. यामध्ये जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL आणि MTNL देखील नवीन प्लॅन आणत आहे. बीएसएनएलनंतर आता MTNL ने आपल्या युजर्ससाठी एक नवीन 251 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. पण, हा प्लॅन केवळ MTNL च्या मुंबईतील ग्राहकांसाठी आहे. या नव्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1 जीबी डेटा म्हणजेच एकूण 28 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळतो.

एमटीएनएलने मुंबईतील ग्राहकांसाठी 251 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन आणला असून यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड फ्री लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस पाठवण्याचीही सुविधा आहे. 28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनला कंपनीने STV 251 असे नाव दिले आहे. अनलिमिटेड फ्री लोकल आणि एसटीडी कॉलिंगची सुविधा देण्यात येत असली तरी 139 सारख्या स्पेशल नंबर्सवर कॉल केल्यास टॅरिफ प्रमाणे दर आकारले जातील असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

दररोज मिळणाऱ्या डेटाची मर्यादा संपल्यानंतर एमटीएनएल आपल्या ग्राहकांना डेटासाठी दर 10 केबीसाठी 3 पैसे शुल्क आकारेल. MTNL च्या या नवीन 251 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची टक्कर Vodafone Idea च्या 299 रुपयांच्या आणि Jio च्या 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनशी असेल. Vodafone Idea च्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, व्होडाफोन प्ले सबस्क्रिप्शन आणि झी5 सबस्क्रिप्शन मिळते. तर, जिओच्या 249 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी 4जी डेटा, अनलिमिटेड जिओ टू जिओ कॉलिंग, जिओ टू नॉन जिओ कॉलिंगसाठी 1000 मिनिटे आणि दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते.