20 September 2020

News Flash

श्वसनविकारांवर संगीतोपचार अधिक प्रभावी

अमेरिकेतील माऊंट सिनायी बेट इसरायलच्या द लुईस आर्मस्ट्राँग सेंटर ऑफ म्युझिक अ‍ॅण्ड मेडिसिनने हा दावा केला आहे.

| December 26, 2015 02:08 am

सीओपीडी बाधित रुग्ण नेहमीच सामाजिकरीत्या दुर्लक्षित असतात.

फुप्फुसांचे विकार वा श्वसनांचे आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी संगीतोपचार ही अतिशय प्रभावी व परिणामकारक उपचार पद्धती आहे, असा दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनांती केला आहे.
फुप्फुसाचे आणि श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांवर संगीतोपचार केल्याने त्यांचे विकार नियंत्रणात आल्याचे दिसून आले आहे. या उपचार पद्धतीमुळे रुग्णांमधील सुधारणेतील सातत्य, सक्षम मानसिकता आणि दैनंदिन जीवनमान हे सामान्य उपचार पद्धतीचा अवलंब करणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक उंचावल्याचे दिसून आले आहे.
अमेरिकेतील माऊंट सिनायी बेट इसरायलच्या द लुईस आर्मस्ट्राँग सेंटर ऑफ म्युझिक अ‍ॅण्ड मेडिसिनने हा दावा केला आहे. त्यांनी संगीत ऐकण्याची उपचार पद्धती नक्कीच सर्वसाधारण उपचार पद्धतीपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकन नागरिकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या पहिल्या चार आजारांमध्ये सीओपीडी रोगाचा (फुप्फुसाचा विकार) चौथ्या क्रमांक लागत असून श्वसनाचे विकार, घरघर, खोकला, सातत्यपूर्ण ताप आणि सर्दीसोबतच छाती भरण्याचे विकाराचे प्रमाणही अधिक आहे.
सीओपीडी बाधित रुग्ण नेहमीच सामाजिकरीत्या दुर्लक्षित असतात. त्यामुळेच त्यांना चांगल्या उपचार पद्धतीपासून वंचित राहावे लागत आहे. त्यासाठी पूरक आरोग्य सेवेचा अभाव आणि पुनर्वसन कार्यक्रमांमधील अडथळेही कारणीभूत आहेत. शास्त्रज्ञांनी श्वसनाचे विकार आणि सीओपीडी बाधित ६८ रुग्णांचा अभ्यास केला. या वेळी टप्प्याटप्प्याने प्रत्येक समूहावर संगीतोपचार पद्धती केली गेली. प्रत्येक सत्रात संगीत अनुभव घेणे, वायूच्या साहाय्याने वाजवल्या जाणाऱ्या संगीत वाद्यांचा आणि गाणे गाण्याचा रियाज, ज्यातून श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवण्याच्या सरावाचाही अंतर्भाव केला गेला.
या शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख जोनेन लोवे यांच्या मते, श्वसनाचे विकारांसंबधीची काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णाची दैनंदिन जीवनशैली, संस्कृती, कुटुंबीय, घरची परिस्थिती या सर्वाचा अभ्यास आवश्यक आहे. श्वसनाच्या विकाराकडे सकारात्मकपणे बघण्यासाठी संगीत हा एकमेव पूरक घटक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:08 am

Web Title: music is more effective on respiratory disorders
Next Stories
1 चालण्याच्या व्यायामाने वृद्धांच्या स्मृतीत सुधारणा
2 आग्नेय आशियात दररोज ७४०० नवजात बालकांचा मृत्यू
3 भारतात गरिबी, मातेचे अनारोग्य कुपोषणास कारणीभूत
Just Now!
X