News Flash

संगीतोपचारांनी मुलांच्या नैराश्येत घट

भावनिक, विकासात्मक व वर्तनात्मक प्रश्न यात हाताळण्यात आले.

| November 15, 2016 01:25 am

प्रातिनिधिक छायाचित्र

संगीत उपचारांनी मुलांमधील नैराश्य कमी होऊन त्यांची आत्मविश्वासाची पातळी वाढते, त्यांचे भावनिक व वर्तनात्मक प्रश्न सोडवण्यास मदत होते असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. किमान २५१ मुलांवर मार्च २०११ ते मे २०१४ दरम्यान करण्यात आलेल्या प्रयोगातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या मुलांचे दोन गट करण्यात आले, त्यात १२८ जणांना नेहमीचे उपचार देण्यात आले तर १२३ जणांना संगीत उपचार देण्यात आले. भावनिक, विकासात्मक व वर्तनात्मक प्रश्न यात हाताळण्यात आले. ८ ते १६ वयोगटांतील मुलांमध्ये त्यांचे आत्मबल वाढले तर नैराश्य इतर उपचारांपेक्षा संगीताने कमी झाले. बोर्नमाऊथ विद्यापीठ व बेलफास्ट विद्यापीठ येथे हा अभ्यास करण्यात आला असून त्यात १३ वर्षे व त्यावरील वयोगटातील मुलांना संगीतोपचार देण्यात आले असता त्यांची संज्ञापन कौशल्ये बदलली. सर्वच वयोगटात संगीतोपचाराने मुलांचे सामाजिक वर्तनही सुधारले. बोर्नमाऊथ विद्यापीठाचे सॅम पोर्टर यांच्या मते हा अभ्यास मुले व किशोवयीनांवर करण्यात आला असून त्यांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा दिसून आली आहे. मुलांवर संगीतोपचाराचा होणारा परिणाम यावर हे सर्वात मोठे संशोधन आहे, असे बेलफास्टच्या क्वीन्स विद्यापीठाचे व्हॅलेरी होम्स यांनी सांगितले. एव्हरी डे हार्मनी या संस्थेच्या सायरा रेली यांनी सांगितले की, संगीतोपचार नेहमीच मुलांसाठी उपयुक्त असतात हे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत लहान प्रमाणात यावर संशोधन झाले होते, पण आता त्याचे फायदे या नवीन संशोधनातून स्पष्ट झाले आहेत.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 1:25 am

Web Title: musical treatment will help to reduce children depression
Next Stories
1 शिशूवरील अल्कोहोल परिणामांची चाचणी शक्य
2 फॅशनबाजार : डेनिमची मोहिनी
3 स्मार्टफोनच्या अधिक वापरामुळे निद्रेवर परिणाम
Just Now!
X