09 March 2021

News Flash

‘हॅचबॅक’ला पर्याय नॅनो एसयूव्ही

बाजारातील हालचाल पाहत काही ‘एसयूव्हीं’नी बाजारात पदार्पण केले आहे.

बापू बैलकर

वर्षांनुवर्षे हॅचबॅक खरेदी करणारे लोक पर्याय शोधत आहेत. भारतात दरवर्षी दहा लाख हॅचबॅक मोटारींची विक्री होते. दर सहा वर्षांनी जवळजवळ ५८ टक्के वाहनमालक आपली कार बदलतात. त्यांच्यासाठी ‘नॅनो एसयूव्ही’ चांगला पर्याय असल्याचे वाहन उत्पादक कंपन्यांचे म्हणणे असून दहा लाखांच्या आतील ‘एसयूव्ही’ प्रकारातील मोटारी बाजारात उतरविण्याची शक्यता आहे.

आर्थिक मंदीतही वाहन उद्योगाला स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) मोटारींना ग्राहकांनी पसंती दिली. त्यात करोना प्रादुर्भावामुळे ठप्प झालेला वाहन उद्योग आता पूर्वपदावर येत असताना ग्राहक ‘एसयूव्हीं’ना पसंती देताना दिसत आहे. ‘एसयूव्ही’ मोटार घ्यायची आहे, पण आर्थिक बजेट कमी असल्याने ग्राहक पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी या खरेदीदारांना पर्याय देण्यासाठी नॅनो आणि परवडणारी ‘एसयूव्ही’ बाजारात उतरविण्याची तयारी केली आहे. पुढील एक-दोन वर्षांत दहा लाखांच्या आतील अनेक एसयूव्ही प्रकारातील मोटारी बाजारात येण्याच्या तयारीत आहेत.

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे. मोटारींमध्येही आता नवनवीन तंत्राचा वापर होत असून अगदी स्वयंचलित वाहनाच्या दिशेने मोटारींचा प्रवास सुरू आहे. तंत्रस्नेही युवा खरेदीदार एसयूव्ही मोटारींना पसंती देत आहे. गेल्या वर्षी आर्थिक मंदीत अडकलेल्या वाहन उद्योगाला या ‘एसयूव्हीं’नी तारले होते. गेल्या वर्षी मॉरिस गॅराजची एमजी हेक्टर ही भारतात प्रदर्शित झालेली पहिली इंटरनेट एसयूव्ही कार २७ जून रोजी बाजारात आली. किआ मोटरच्या किआ सेल्टॉस टायगर लुक असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा असलेल्या एसयूव्हीने पदार्पणातच ग्राहकांची मने जिंकली होती. याबरोबरच महिंद्रा आणि महिंद्राची एक्सयूव्ही ३००, ुदाईची स्थळ आदी मोटारी बाजारात पसंतीस उतरल्या होत्या.

दरम्यान, करोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या संकटात वाहन उद्योग ठप्प झाला होता. उत्पादन कमी करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. आता शिथिलीकरणानंतर हा उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत आहे. गेल्या काही महिन्यांत सप्टेंबर महिन्यात झालेल्या मोटारींच्या विक्रीमुळे आता करोनानंतरच्या बदलत्या काळानुसार खरेदीदारांना पसंतीस उतरतील व परवडतील असे पर्याय देण्याची तयारी सुरू झाली आहे.

बाजारातील हालचाल पाहत काही ‘एसयूव्हीं’नी बाजारात पदार्पण केले आहे. त्यात एमजी मोटर इंडियाने नुकतीच भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल १) प्रीमियम एसयूव्ही, एमजी ग्लॉस्टर सादर केली. भारतातील पहिली इंटरनेट कार हेक्टर, भारतातील पहिली इंटरनेट विद्युत एसयूव्ही झेडएस ईव्ही यानंतर ग्लॉस्टर हे एमजीचे तिसरे उत्पादन आहे. तर किआ मोटारनेही आपली सोनेट ही मोटार नुकतीच बाजारात उतरवली आहे. मात्र या मोटारींच्या किमती या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. खरेदीदार ‘एसयूव्हीं’बाबत विचारणा करीत आहे, मात्र किमती पाहून दुसरा पर्याय शोधत आहे. त्यामुळे वाहन उत्पादक कंपन्यांनी आता खरेदीदाराच्या पसंतीस उतरणाऱ्या व परवडणाऱ्या किमतीत ‘नॅनो एसयूव्ही’ बाजारात उतरविण्याचे ठरविले आहे.

मारुती सुझुकी,ह्युंदाई मोटर, टाटा मोटर्स आणि निसान या आघाडीच्या कंपनी आपल्या या लहान आकारातील ‘एसयूव्ही’ पुढील काळात बाजारात आणत आहे. त्यांची किंमत ही दहा लाखांपेक्षा कमी असेल. यात मारुती सुझुकी आपली ‘वाय वन के’ बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे. तर टाटा मोटर्स ‘हॉर्नबील’ ही मोटार पुढील दोन वर्षांत बाजारात आणत आहे.ह्युंदाई मोटर्स त्यांची मायक्रो एसयूव्ही पुढील वर्षांत आणेल तर दस्तान आपली गो क्रॉस ही पुढील काळात बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे.

आकर्षक लुक आणि शक्तिशाली इंजिन क्षमता या वाहनांमध्ये असून प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेतलेली असल्याने ‘एसयूव्ही’ना पसंती मिळत आहे.

‘पीएसए’चे भारतातील बाजारावर लक्ष

* मॉरिस गॅरेज, किआ मोटर्स आणि आता फ्रेंच कार उत्पादक कंपनी ‘पीएसएल’ ही भारतातील बाजारावर लक्ष ठेवून आहे.

* तीन कार पुढील काळात भारतीय बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहेत.

इग्निस व केयूव्ही १०० या मोटारींना पर्यायी मोटारी पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

एसयूव्हींना पसंती का?

* दिसायला आकर्षक

* पेट्रोल व डिझेल इंजिन पर्याय

* जमिनीपासूनचे अंतर जास्त

* आरामदायी.. दिवसभर प्रवास करता येईल..

* इंटिरिअरवर भर

* टचस्क्रीन डिस्पले

* चारही बाजूने कॅमेरे

* अत्याधुनिक म्युझिक सिस्टीम

* स्पोर्टी लुकवर भर

* पार्किंग सेन्सर

* ऑटोमॅटिक टायर प्रेशर चेक

* ब्लू लिंक सिस्टीम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 12:41 am

Web Title: nano and suv cars zws 70
Next Stories
1 ‘फाइव्ह-जी’ अ‍ॅपल आयफोन बाजारात
2 वांग्यांमुळे त्वचा होते तजेलदार? जाणून घ्या फायदे
3 उतरत्या वयात होणारा लंबर कॅनॉल स्टीनोसिस म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे व उपाय
Just Now!
X