वैद्य प्रभाकर शेंडय़े drshendye@gmail.com

नासा हि शिरसो द्वारम्।

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?

नाक हे शीर प्रदेशाचे दार आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. खांद्यापासून वरच्या म्हणजेच मान, गळा, नाक, तोंड, कान, डोके या सर्व भागांतील दोष काढून टाकणे तसेच येथील ज्ञानेंद्रियांना बळ देणे, या भागातील रोग निवारण करणे यांसाठी नस्य केले जाते.

नस्य म्हणजे नाकाद्वारे शरीरामध्ये औषध आत सोडणे. यामध्ये विविध औषधी तेल, तूप, वनस्पती चूर्ण, वनस्पतीचे रस यांचा वापर केला जातो.

नस्य प्रकार  :उपयोगानुसार नस्याचे तीन प्रकार आहेत.

विरेचन नस्य- डोके दुखणे, डोके जड होणे, सर्दी यांसाठी बृहण- वातामुळे डोके दुखणे, नाक-तोंड कोरडे पडणे यांसाठी

शमन- केस गळणे,चेहऱ्यावरील तीळ, व्यंग यांसाठी. मात्रेनुसार मर्श व प्रतिमर्श असे दोन प्रकार आहेत. प्रतिमर्श नस्य हे दोन थेंब औषध रोज नाकात टाकले तरी चालते यांमुळे  काही अपाय होत नाही.

नस्य कर्म

* वय वर्षे ७ ते ८० वर्षे यांमध्ये नस्य करता येते.

* ज्या व्यक्तीला नस्य करायचे आहे, त्याला प्रथम खांदे, चेहरा, कपाळ यांना तेल लावून वाफ अथवा शेक दिला जातो

* यानंतर त्यांना डोक्याकडचा भाग किंचित खाली जाईल अशा पद्धतीने झोपवले जाते.

* एक नाकपुडी बंद करून दुसऱ्यामध्ये कोमट केलेले औषध सोडले जाते. त्यानंतर दुसरी बंद करून पहिल्यामध्ये सोडले जाते.

* हळूहळू दोन्ही नाकपुडय़ांनी श्वास आत ओढला जातो.

* यानंतर घशात आलेले औषध व सुटलेला कफ थुंकायला सांगितले जाते.

* यानंतर एक ते दीड मिनिटे झोपून ठेवले जाते.

* घशात चिकटलेला कफ सुटावा यासाठी औषधी धूर दिला जातो.

* यानंतर कोमट पाण्याच्या गुळण्या केल्या जातात.

* हे प्रक्रिया रोज ७ दिवसांपर्यंत केली जाते.

नस्य फायदे

*  श्वासोश्वास चांगला व आरामात होतो.

*  इंद्रियांना बळ मिळते, मन प्रसन्न होते.

* कफ बाहेर पडून जातो.