पारंपरिक आयुर्वेदिक शिक्षणाची गुणवत्ता टिकावी यासाठी सरकार आयुर्वेदिक डॉक्टरांचा राष्ट्रीय आयुष आयोग तयार करण्याच्या विचारात आहे. यामागे आयुष व्यावसायिक डॉक्टरांचे शिक्षण व नोंदणी याची दखल घेण्यात येणार आहे.

आयुष खात्यातील सल्लागार (आयुर्वेद) डॉ. मनोज नेसरी यांनी आम्हाला याबाबतचा प्रस्ताव मिळाल्याचे सांगितले. शेवटचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. सध्या याबाबत ‘व्हाइट पेपर’ तयार करण्यात येत असून श्रीपाद येस्सो नाईक यांच्याकडून संमती मिळाल्यावर ते निती आयोगाकडे पाठविले जातील. प्रस्ताव अद्यापिही प्राथमिक पातळीवर असला तरी राष्ट्रीय आयुष आयोग हा स्वतंत्र असावा की राष्ट्रीय वैद्यकीय आयोगासोबत राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या ऐवजी संलग्न असावा, याबाबत चर्चा सुरू आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)