नवरात्रोत्सवात दांडिया नृत्याचे प्रस्थ वाढल्यानंतर एरवी दिवाळीनिमित्त होणारी नवीन कपडे खरेदी पितृ पंधरवडय़ातच होऊ लागली. प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार या काळात कपडय़ांची खरेदी करतात. त्यात अर्थातच तरुणाई आघाडीवर असते. बाजारात आलेले नवे कपडे लगेच वापरून इतरांवर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्न तरुण-तरुणी करीत असतात. प्रत्येक दिवस स्वतंत्र रंगासाठी राखीव असल्याने बहुतेक सर्व रंगांना न्याय मिळतो. त्यामुळे या काळात एक प्रकारे नऊ दिवस ठिकठिकाणी सामूहिक दांडिया नृत्याबरोबरच फॅशन शोही भरतो..

गणेशोत्सवापाठोपाठ येणारा नवरात्रोत्सव आता या काळात ठिकठिकाणी खेळल्या जाणाऱ्या रास गरबा आणि दांडिया नृत्यांमुळे ओळखला जाऊ लागला आहे. साधारण दोन दशकांपूर्वी नवरात्रीतल्या या दांडियांचे प्रस्थ वाढले. गरबा हे गुजराती समाजाचे पारंपरिक लोकनृत्य. गुजराती समाजात नवरात्रीत गोल फेर धरून रासगरबा खेळला जातो. बंगालमध्येही देवीची पूजा केली जाते. महाराष्ट्रात मात्र घरगुती स्वरूपात घटीदेव बसविण्यापुरताच हा उत्सव मर्यादित होता. पुढे गरब्याच्या पारंपरिक ठेक्याला हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांची साथ लाभून त्याचे डिस्को दांडिया या फ्यूजनमध्ये रूपांतर झाले. सामूहिक नृत्य हा हिंदी चित्रपटातील तद्दल फिल्मी प्रकार. मात्र नवरात्रीच्या सध्या प्रचलित असलेल्या अवतारात हे चित्रपटीय दृश्य प्रत्यक्षात साकारलेले दिसते. नवे कपडे घालून दांडिया खेळणे हा तरुणाईचा आवडता छंद आहे. त्याला आता रंगसंगतीची जोड लाभली आहे. त्यामुळे नवरात्रीमध्ये काय घालून गरबा खेळायला जायचं? त्याची खरेदी कुठे करायची? असे अनेक प्रश्न तरुणांना सतावीत असतात. पितृ पंधरवडा खरेदीच्या दृष्टीने तसा भाकड. मात्र नवरात्रीच्या तयारीसाठी या काळातही दुकाने सजलेली असतात. त्यामुळे तरुण तरुणींचे जत्थे भिरभिरत्या नजरेने बाजारात आपल्याला आवडणारे आणि परवडणारे काही मिळतेय का याचा शोध घेताना दिसते. हल्ली नऊ दिवसांसाठी निरनिराळ्या रंगांचे पेहेराव तरुणाई करते. त्यासाठी बरेच पैसेही खर्च करते. मात्र हौसेला मोल नसते म्हणतात, तेच खरे. एरवी तरुणाई ड्रेसकोड पाळत नाही. असे विशिष्ट बंधनात अडकणे त्यांना आवडत नाही. मात्र विशिष्ट रंगांचा हा संकेत मात्र ती पाळताना दिसते. मात्र रंग जरी एक असला तरी त्याचे प्रकार मात्र विभिन्न असतात.

plenty of water in koyna dam
विश्लेषण : राज्य दुष्काळात, तरी कोयना धरणात सुरक्षित जलसाठा कसा?
onion, Nashik, onion auction,
विश्लेषण : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे लिलाव बंद राहण्याचे कारण काय? परिणाम काय?
MHADA Lease Renewal Linked to Ready Reckoner Rates Housing Societies Face High Renewal Costs
म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच! दंडात्मक तरतुदीत सहा महिन्याची सवलत
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’

गरब्याचे मैदान म्हणजे भलामोठा रॅम्पच. मदानात दाखल होताना सर्वाचे लक्ष आपल्याकडे जावं, आपण सर्वामध्ये उठून दिसावं ही समस्त तरुण वर्गाची इच्छा असते. त्यामुळे या रॅम्पवर ट्रेडिशनल, वेस्टर्न, फ्यूजन अशा सगळ्या प्रकारची फॅशन पाहायला मिळते.

सुटसुटीत पेहेरावाला पसंती

नवरात्र उत्सवाचे वेध लागताच बाजारातही एम्ब्रॉयडरी केलेल्या चनिया-चोली, विविध प्रकारचे घागरा-चोली, मुन्नी स्टाईल घागरा-चोली, मेटलचे दागिने, मुलांसाठी केडीयू ड्रेसेस असे भरपूर प्रकार उपलब्ध झाले असतात. मात्र गरब्यासाठी ऑफिसमधून धावतपळत घरी परतायचं आणि मग तो हेवी घागरा घालून दांडियाला जायचं थोडं त्रासदायक ठरतं. अशावेळी बाजारात फॉर्मल+ट्रेडिशनल असं काही कॉम्बिनेशन मिळतं का, याचा शोध घ्यावा लागेल..

भरजरी दुपट्टा

प्लेन कुर्ती आणि लेगीन या फॉर्मल पेहरावावर कवडय़ा, कच्छी वर्क, आरसे, मोती लावून सजवलेला हेवी दुपट्टा रात्री गरब्याच्या मैदानात तरुणींवर उठून दिसतो. या पेहरावावर पारंपरिक गुजराथी दागिन्यांचा साज अधिक उठून दिसेल. अशा प्रकारचे बांधणी प्रिंट, अबला वर्कचे, कशिदा वर्कचे भरतकाम केलेले दुपट्टे बाजारात उपलब्ध आहेत.

प्रिंटेड धोती

एरवी आपण ऑफिसला जाताना कुर्ती आणि लेगिन वेअर करतो. मात्र नवरात्रीमध्ये प्लेन कुर्ती आणि प्रिंटेड धोतीचा पर्याय उत्तम ठरू शकेल. त्यावर विविध रंगाचे कुर्ते आणि बांधणीची ओढणी घेतल्यावर गरब्यांसाठी एक आकर्षक पेहराव आपल्याला मिळेल. त्यावर विणकाम केलेली मोजडी अधिक उठून दिसेल.

कॉटन स्कर्ट

हेवी घागरा घालण्याचा कंटाळा येतो, मग आता बुटी प्रिंटच्या शॉर्ट टॉप आणि राजस्थानी, लेहरीया प्रिंट कॉटनचा मिनी घेर असलेला स्कर्ट हे एक हटके काँबिनेशन आपल्याला यंदा बाजारात पाहायला मिळेल.

गमठी जॅकेट्सची क्रेझ

पारंपरिक वेशभूषेसोबत भरतकाम केलेले गमठी जॅकट्स हल्ली गरबा स्पेशल कपडय़ांच्या यादीत मोडू लागले आहेत. तरुणींसाठी खास कुर्ताना जोडलेले किंवा वेगळे असे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. उत्तम शरीरसौष्ठव असलेले तरुण स्लिव्हलेस जॅकेट्स आणि जिन्स असा पेहराव घालणे पंसत करतात. त्याप्रमाणे मुलीही गडद रंगाचा प्लेन टी-शर्ट आणि त्यावर उलट रंगाचा गमठी जॅकेट आणि जीन्स अशा पेहरावाला प्राधान्य देतात.

गरबा स्पेशल दागिने

पेहराव कोणताही असो, दागिने मात्र पारंपरिक असल्यास गरब्याचा फिल आल्याशिवाय राहत नाही. जीन्स आणि टॉपवर रंगबेरंगी ज्वेलरी घातल्यावर एक वेगळाच इंडो-वेस्टर्न लूक येतो. अशा वेगवेगळ्या मेटलच्या दागिन्यांवरही तरुणींच्या उडय़ा पडतात. मेटल आणि रंगबेरंगी धाग्यापासून बनविलेले आकर्षक नेकलेस यंदा बाजारात उपलब्ध आहेत. हातातले ‘राजस्थानी कडे’, मोठे कानातले आदी आभूषणे पारंपरिकतेत आणखी भर टाकतात.

कुठे- ठाण्यातील बाजारपेठा आणि दुकाने नवरात्रीसाठी सज्ज झाल्या आहेत. ठाण्यातील जांभळी नाका, राम मारुती रोड, गोखले रोड या भागात या सर्व वस्तू उपलब्ध आहेत.

किंमत- साधारण १०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत या सर्व वस्तू मिळतील.