03 March 2021

News Flash

Navratri Recipes : उपवासाचा पायनॅपल राइस

उपवासाला गोड पदार्थ म्हणून करायला छान आहे

उपवासाचा पायनॅपल राइस

साहित्य : वरीचे तांदूळ (एक वाटी),  साखर  (पाऊण वाटी),  पायनॅपलचे बारीक तुकडे(  एक वाटी ), पायनॅपल इसेन्स (पाव चमचा),  मीठ (पाव चमचा), काजू, बदाम, बेदाणे (आवडीनुसार),  साजूक तूप ( पाव वाटी), लवंगा (चार )

कृती : पाव वाटी साखरेत पायनॅपलचे तुकडे घालून शिजवून घ्या. जाड बुडाच्या भांडय़ात तूप घाला. त्यावर लवंगा घाला. धुतलेले वरीचे तांदूळ घालून परतून घ्या. दुप्पट पाणी, मीठ घाला, भात शिजवा, नंतर त्यात साखर, पायनॅपलचे तुकडे घालून एकजीव करा. परत तूप घाला. झाकून वाफ येऊ द्या. काजू-बदामाने सजवून सव्‍‌र्ह करा.* उपवासाला गोड पदार्थ म्हणून करायला छान आहे.

मंजिरी कपडेकर

सौजन्य – लोकप्रभा

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 9:23 am

Web Title: navratri recipes navratri vrat recipes for 9 days pineapple rice
Next Stories
1 सर्व लशी एकाच टोचणीत देण्याचे तंत्रज्ञान विकसित
2 फेकून देऊ नका, कारण खूप उपयोगी आहे ‘ही’ छोटीशी पुडी
3 मुलायम, घनदाट केसांसाठी कोरफडीचा असा करा वापर
Just Now!
X