रोजच्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केल्याने मूत्रपिंडाच्या आजारापासून संरक्षण मिळू शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. विशेष करून तरुण वयापासूनच मीठ कमी सेवन करण्याची सवय ठेवली पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. देशात मूत्रपिंड निकामी होणे हे मृत्यूचे पाचवे प्रमुख कारण आहे. स्वयंपाकघराची सूत्रे महिलांकडे असतात तेव्हा त्यांनीच मिठाचा वापर कमी करण्याची आवश्यकता आहे. २५ ते ३० वयोगटातील मूत्रपिंड रुग्णांची संख्या वाढत असून ती पाच-सहा वर्षांपूर्वी एवढी जास्त नव्हती, असा दावा मुंबईच्या सैफी रुग्णालयाचे मूत्रविकारतज्ज्ञ अरुण दोशी यांनी केला आहे. अतिरक्तदाब हा विकार मूत्रपिंड निकामी होण्यामुळे होऊ शकतो. किंबहुना ते त्यामागे एक प्रमुख कारण आहे. मीठ आणि रक्तदाब यांचा थेट संबंध आहे. जास्त मीठसेवनाने रक्तदाब वाढतो. रक्तदाब कमी झाला तर अतिरक्तदाब आटोक्यात येऊ शकतो. आपण आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. त्यात मीठ कमी असले पाहिजे, चीज बटर, साखर व मीठ हे प्रमुख घटक शरीरास घातक आहेत. त्यांचे सेवन कमी केले पाहिजे. उत्तर भारतातून तरुण मुले डायलिसिससाठी येतात, असे अपोलो रुग्णालयाचे डॉ. अमित लंगोटे यांनी सांगितले. लठ्ठपणा व मधुमेह यामुळे मूत्रपिंडाचे विकार होतात असे सांगून ते म्हणाले की, महिलांमध्ये मिठाचा कमी वापर करण्याबाबत जागृती केली पाहिजे. लोणची, पापड, चटणी व जादाचे नमकीन पदार्थ टाळले पाहिजेत. सैफी रुग्णालयाचे हेमल शहा यांनी सांगितले की, कमी उष्मांक व कमी मीठ असलेला आहार आवश्यक आहे. फळे, भाज्या, कमी मेदाचे दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश आवश्यक आहे. कधीच जेवणात जास्तीचे मीठ वाढून घेऊ नका. सॅलडवर मीठ टाकून घेऊ नका. आदिती शेलार यांनी सांगितले की, वेदनाशामक औषधे व इतर औषधे शक्यतो टाळली पाहिजेत त्यामुळे मूत्रपिंडावर वाईट परिणाम होतो.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
simple tips and yoga to reduce PCOS problem
स्त्रियांनो, ‘PCOS’ चा त्रास कसा कराल कमी? आराम मिळण्यासाठी समजून घ्या तज्ज्ञांनी सुचविलेली ही पाच आसने