News Flash

अनेक समस्यांवर रामबाण उपाय ठरतो कडुनिंब; जाणून घ्या फायदे

कडुनिंब झाडाचे असंख्य उपयोग

कडुनिंब झाडाचे असंख्य उपयोग आहेत. ती एक मौल्यवान औषधी वनस्पती आहे. हजारो वर्षांपासून भारतात त्याचा उपयोग केला जातो. ‘चरकसंहिता’ या प्राचीन आयुर्वेद ग्रंथात त्याचा उल्लेख सर्व रोग निवारिणी तथा आरिष्ट असा केला आहे. कडुनिंब या झाडाची मुळे, खोड, खोडाची साल, डिंक, पान, फुले, फळे, त्यापासून काढलेले तेल व तेल काढून राहिलेली पेंड अशी प्रत्येक गोष्ट अनमोल आहे. त्यामुळेच त्याला एक वृक्ष औषधालय असे म्हणतात. कडुनिंबाच्या पानात बुरशीनाशक व जंतुनाशक गुण आहेत. व त्यामुळेच त्वचा व केस यांच्या अनेक व्याधी दूर करण्यासाठी लिंबोणी पर्णरसाचा उपयोग केला जातो. त्वचेचा कोरडेपणा व खाज दूर करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. कडुनिंब पेस्टचा उपयोग हेअर कंडिशनर म्हणून उपयोग केला जातो.

चेहऱ्यावरील तारुण्यपीटिकांवर लिंबोणी तेलाचा उपाय परिणामकारक ठरतो. कडुनिंबाचे तेल हे अँटी बॅक्टेरियल, अँटी फन्गल, अँटी मायक्रोबियल असल्यामुळे अनेक प्रकारच्या त्वचा रोगांवर हे तेल रामबाण आहे. विशेषत तेल लावल्यावर ती व्याधी परत उद्भवत नाही. कडुनिंब तेलात फॅटी अ‍ॅसिड व ई जिवनसत्त्व आहे व ते त्वचेत सहज व जलदगतीने शोषून घेतले जाते. त्यामुळे खरुज, नायटा यांसारख्या व्याधी सहज बऱ्या होतात.

कडुनिंबाची पान चवीला कडू असली तरी त्याचे फायदे अनेक आहेत. शरीरातील अंतर्गत व्याधींपासून त्वचेच्या आजारापर्यंत कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. निसर्गानं कडुनिंब बनवलं ते माणसाला निरोगी ठेवण्यासाठीच जणू काही. रोज कडुनिंबाची दोन कोवळी पान खाल्ली तर आपलं आरोग्य उत्तम राहिलं. याशिवाय कोणताही आजार होणार नाही.

शेतीसाठी उपयोग
कडुनिंब तेल व कडुनिंब पर्णरस यांचा उपयोग शेतीतही मोठय़ा प्रमाणावर केला जातो, कारण ते जंतुनाशक, कीटकनाशक व बुरशीनाशक आहे. शेतकऱ्याला आपल्या शेतावरच पिकावरील रोगप्रतिबंधक व रोगनाशक औषधे निर्माण करता येतात. बाजारातून औषधे विकत आणण्याची गरज नाही. शिवाय कडुनिंबाची पेंड हे नायट्रोजनयुक्त उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे. रासायनिक युरिया खतापेक्षा ते अधिक गुणकारी आहे.

(टीप – ही केवळ सर्वसामान्य माहिती देण्यात आली आहे. हा कोणत्याही प्रकारे अचूक उपचाराचा पर्याय नाही. त्यामुळे अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा अथवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 7:50 am

Web Title: neem benefits immunity and anti aging properties know the benefits nck 90
Next Stories
1 तमालपत्राचे हे फायदे वाचून तुम्हीही हैराण व्हाल
2 तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास आहे?, जेवणाआधी फक्त हे एक काम करा आणि अ‍ॅसिडिटीला पळवून लावा
3 आंबट-गोड कैरी खाण्याचे गुणकारी फायदे
Just Now!
X