22 October 2020

News Flash

आज ‘नीट’ परीक्षेचा निकाल? असा करा चेक

NEET EXAM Result 2020 :

NEET EXAM Result 2020 : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेचा (National Eligibility cum Entrance Test (NEET)) निकाल आज लागणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन आवश्यक आहे. नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर एनटीए कॅटेगिरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर केला जाणार आहे

नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास उशीर होणार नसल्याचं शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे. १३ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परिक्षा सुरळीत पार पडली होती. देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची ६१५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

कसा पाहाल निकाल –
ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
येथे नीट अ‍ॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन टाकून सबमिट करा.
नीट 2020 चा निकाल आपल्या स्क्रीनवर दिसेल.
निकाल डाऊनलोड करुन सेव्ह करा अन् त्याची प्रिंटआऊटही काढा.

Steps to check NEET 2020 final answer key:

Step 1:  ntaneet.nic.in या संकेतस्थळावर जा

Step 2: होमपेजवर  “NEET (UG) – 2020 Final Answer Key” पर्याय निवडा

Step 3: उत्तर पत्रिकेची पीडीएफ फाईड मिळेल.

Step 4: तुमची उत्तरे आणि ही उत्तरे जुळतात का पाहावी… यावरुन तुम्हाला निकालाचा अंदाज येऊ शकेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 10:19 am

Web Title: neet result 16 october announced today scorecard new change result nck 90
Next Stories
1 समजून घ्या : भारताने बनवलं थेट शत्रूचं रडार भेदणारं क्षेपणास्त्र
2 समजून घ्या : तुमच्या घरी वीज कशी येते? ग्रीड फेल्युअर म्हणजे काय?
3 दोन दिवसांत ‘नीट’ परीक्षेचा निकाल? असा करा चेक
Just Now!
X