मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये (नॅशनल काउन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स) काम करण्याची संधी आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. येथे प्रशिक्षार्थी (क्राफ्ट) व शिकाऊ उमेदवारांच्या भरतीकरिता जाहिरात निघाली आहे.

(१) प्रशिक्षार्थी (क्राफ्ट) – ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १ पद,

रेफ्रिजरेशन अँड एअरकंडिशिनग – १ पद.

पात्रता – संबंधित ट्रेडमधील एसएससी

व आयटीआय प्रमाणपत्र २०१७ किंवा

त्यानंतर उत्तीर्ण.

प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्षांचा असेल जो

१ वर्षांने वाढविला जाऊ शकतो.

स्टायपेंड – उमेदवारांना दरमहा रु. १०,०००/- स्टायपेंड दिला जाईल.

(२) शिकाऊ उमेदवार (अ‍ॅप्रेंटिसेस)

कारपेंटरी – २ पदे.

फिटिंग – १ पद, वेल्डिंग – १ पद,

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – १ पद.

पात्रता – संबंधित ट्रेडमधील एसएससी व आयटीआय उत्तीर्ण.

प्रशिक्षण – कालावधी १ वर्षांचा असेल.

स्टायपेंड – उमेदवारांना दरमहा रु. ७,८७७/- स्टायपेंड दिले जाईल.

शिकाऊ उमेदवारीकरिता, पात्र उमेदवारांनी स्वत:ला http://www.apprenticeship.gov.in

या अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी केलेली आहे.

ते लेखी/ट्रेड चाचणीकरिता थेट मुलाखत देऊ शकतील. उमेदवारांनी अर्हता व जन्मतारखेच्या पुष्टय़र्थ त्यांच्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती तसेच एक पासपोर्ट आकाराचा फोटो, मूळ प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहेत.

जाहिरातीचा तपशील आणि विहित अर्ज प्रपत्रे http://www.nehrusciencecentre.gov.in

या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.

पूर्ण भरलेले अर्ज प्रपत्रे चाचणीच्या वेळी दि. ६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९.३० वाजता सादर करण्यात यावीत.

मुलाखतीचे वॉक-इन-टेस्टचे ठिकाण वर दिल्याप्रमाणे.

नेहरू सायन्स सेंटरचा टेलिफोन नं.

०२२- २४९३२६६७ / २४९२०४८२