04 August 2020

News Flash

८३ वर्षे मोफत नेटफ्लिक्स… जाणून घ्या भन्नाट ऑफर

१९ जुलैपर्यंत सुरू राहणार ऑफर

नेटफ्लिक्स, अॅमॅझॉन प्राईम आणि अन्य ओटीटी प्लॅटफॉर्म्स आजकाल सर्वांच्याच पसंतीस उतरत आहेत. ग्राहकांनाही आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी या कंपन्यांकडून निरनिराळ्या ऑफर्स देण्यात येत असतात. परंतु सध्या नेटफ्लिक्सनं एक भन्नाट ऑफर सुरू केली आहे. ती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. एक-दोन-तीन नाही तर तब्बल ८३ वर्षे किंवा १ हजार महिने मोफत नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन देण्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.

परंतु कंपनीनं यासाठी एक अट घातली आहे. ही अट अशीतशी नाही तर हे सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी तुम्हाला एक गेम खेळावा लागणार आहे. या गेमचं नाव आहे ‘द ओल्ड गार्ड’. या गेममध्ये तुम्हाला टॉप स्कोअरर बनावं लागणार आहे. नेटफ्लिक्सनं नुकताच एक चित्रपच प्रदर्शित केला होता. या चित्रपटात चार्लिज थेरॉन यांनी भूमिका साकारली होती. सध्या नेटफ्लिक्सनं न्यू नेटफ्लिक्स ओरिजनल स्ट्रीमिंग सर्व्हिससाठी इम्मॉर्टल नेटफ्लिक्स अकाऊंट लाँच केला आहे. याअंतर्गत युझर्सना ८३ वर्षांसाठी नेटफ्लिक्सचं सबस्क्रीप्शन देण्यात येतं.

ऑल्ड गार्ड गेम हा ब्राऊसरवर आधारित एक गेम आहे. https://www.oldguardgame.com/ या वेबसाईटवर हा गेम खेळता येणार आहे. सध्या नेटफ्लिक्स इम्मॉर्टल गेम अॅक्टिव्ह आहे. १९ जुलैपर्यंत ही ऑफर सुरू राहणार असून या गेमदरम्यान सर्वाधिक स्कोअर करणाऱ्या युझरला ८३ वर्षांसाठी हे सबस्क्रीप्शन मिळणार आहे. परंतु सध्या केवळ अमेरिकेतील नेटफ्लिक्स युझर्ससाठी ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 3:05 pm

Web Title: netflix news offer 83 years of free subscription play game the old guard jud 87
Next Stories
1 डायबेटिसच्या रुग्णांसाठी वरदान आहे मेथी; जाणून घ्या फायदे
2 मध आणि दालचीनीच्या मिश्रणाचं सेवन केल्यास होतील हे फायदे
3 डोळ्याखालची Dark Circles घालवायची आहेत? हे आहेत घरगुती उपाय
Just Now!
X